संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी
Maharashtra Assembly Elections 2024: राज्यात शिवसेना शिंदे गट भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढत आहेत महायुतीतील नाराजांचे बंड मोडून काढण्यात बऱ्याच अंशी तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश मिळाले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच गोरेगाव विधानसभेत मात्र महायुतीत अंतर्गत कुरबुर सुरू असून अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गोरेगाव विधानसभेच्या उमेदवार विद्या ठाकूर आणि त्यांच्या घराणेशाहीवर शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिक आणि हिंदू संघटनांचे अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे.
विद्या ठाकूर यांच्या प्रचारात शिवसैनिक देखील फारसा दिसून येत नाही त्यामुळे विद्या ठाकूर यांचा निवडणुकीचा मार्ग काहीसा खडतर होत चालला आहे. विद्यमान आमदार आणि गोरेगाव विधानसभेच्या उमेदवार विद्या ठाकूर आणि ठाकूर परिवार यांनी फक्त हिंदुत्वाचा पोशाख घातला आहे कमळ चिन्हाच्या आड त्यांनी मलाई आणि मलिदा खाल्ला असून समाजाच्या उद्धाराचं एकही काम केलं नाही त्यामुळे गोरेगावची हिंदू जनतेने विद्या ठाकूर यांना पराभूत करण्याचा निर्धार केला असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा संघटक मिलिंद कापडे यांनी म्हटले आहे. शिंदेच्या शिवसैनिकांची आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची नाराजी ठाकूर यांच्या विजयाच्या हॅट्रिक मध्ये अडथळा ठरणार की अडथळा पार करून ठाकूर हॅट्रिक करणार हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे.
2014 पासून विद्या ठाकूर या गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.मागच्या अनेक वर्षापासून ठाकूर परिवार हा गोरेगावच्या राजकारणात सक्रिय 2014 मध्ये तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा पराभव करून विद्या ठाकूर या आमदार मागील दोन टर्म पासून त्या गोरेगावच्या आमदार म्हणून आहेत मंत्रीपद देखील त्यांना मिळालं मात्र या विद्या ठाकूर आठवी पास आहेत या महिलेला दोन वेळा जनतेने निवडून दिले परंतु निवडून दिल्यानंतर विद्याताई ठाकूर, जयप्रकाश ठाकूर, आणि त्यांचा मुलगा दीपक ठाकूर यांनी कुठल्याच प्रकारचे काम गोरेगाव मध्ये केले नसल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा संघटक मिलिंद काकडे यांनी केला आहे.
कापडे पुढे म्हणाले, या गोरेगावची हिंदू जनता, मतदार जनता यांनी यावेळी ठरवलेला आहे या वेळेला ठाकूर परिवाराला त्यांची जागा दाखवून देऊ. गोरेगाव मध्ये आरोग्याबाबत ठाकूर यांनी कसलेही काम केले नाही साधी रुग्णवाहिका देखील त्यांना विधानसभा मतदारसंघात देता आली ठाकूर परिवाराने फक्त आणि फक्त मलई आणि मलिदा खाण्याचं काम केलेला आहे त्यामुळे त्यांना यंदा त्यांची जागा दाखवल्याशिवाय गोरेगावची जनता शांत बसणार नाही असेही कापडे यांनी म्हटले आहे.
युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? मिलिंद कापडे
मिलिंद कापडे म्हणाले, युतीधर्म हा विषय फार महत्त्वाचा आहे. हा विषय माझ्याकडे दहा वेळा आला युती धर्माचे ज्ञान मला बऱ्याच लोकांनी दिल. त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो युती धर्माचा ठेका फक्त मिलिंद कपडे आणि एकनाथ शिंदे यांनीच घेतला आहे का? भाजपाच्या लोकांनी घेतला नाही का? अख्या महाराष्ट्रात जर तुम्ही फिरलात जिथे जिथे शिंदे साहेबांचे कॅंडिडेट उमेदवार आहेत त्या ठिकाणी भाजपाच्या लोकांनी अपक्ष उमेदवार उभे केले आहेत दुसरा विषय तिथे अपक्ष नसेल तर भाजपाचे लोक शिंदे साहेबांना शिंदे साहेबांच्या उमेदवाराला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा विरोध करत आहे. भाजपा युती धर्माचे खंडन करत नाहीत का? त्यांना पक्षातून काढले का सबर्बन एरियात किती ठिकाणी शिंदे साहेबांच्या गटाला विरोध होत आहे. असं जर चालत असेल युती धर्माचा आम्ही ठेका नाही घेतला युती धर्म सर्वांनी पाळावा अशी आमची प्रमाणित इच्छा आहे असेही कापडे यावेळी म्हणाले.
कापडे पुढे असेही म्हणाले, ठाकूर परिवार हा फक्त आणि फक्त हिंदुत्वाचा पोशाख घातलाय ठाकूर परिवाराने हिंदुत्वाच्या नावाखाली कमळ या चिन्हाच्या आड त्यांनी स्वतः मलाई खाली मलिदा खाल्ला आजही तेच करतात समाज उपयोगी काम एकही केलं नाही समाजाच्या उद्धाराचे काम केलेलं नाही त्याचबरोबर या गोरेगावच्या विकासाचे काम जरा देखील ठाकूर परिवाराच्या माध्यमातून झालेलं नाही म्हणून गोरेगावच्या जनतेने ठरवले यांना यांची जागा आम्ही दाखवणार आतापर्यंत काय व्हायचं गोरेगाव मध्ये जे भाजपाचे लोक सांगतील ती हिंदू जनता येथील परंतु यंदा हा विषय वेगळा आहे समीकरण बदलला आहे जे हिंदू जनता गोरेगावची सांगेल हे भाजपाच्या लोकांना ऐकावे लागेल असेही कापडे यांनी म्हटले आहे.