Horoscope 15 November: 'या' राशीच्या लोकांनी महत्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत
esakal November 15, 2024 02:45 PM
मेष :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मेष वृषभ :

वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मिथुन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या तुळ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

तुळ वृश्चिक :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

वृश्चिक धनु :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर :

राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

मीन :

मानसिक स्वस्थ्य व समाधान लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.