NTPC ग्रीन एनर्जी IPO: सध्या एनटीपीसी (NTPC) ग्रीन एनर्जी आयपीओची सगळीकडे चर्चा आहे. ही कंपनी स्वत:चा विस्तार करण्यासाठी कोट्यवधी रुपये जमवणार आहे. दरम्यान, हा आयपीओ आतापर्यंतचा रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमधील सर्वांत मोठा आयपीओ असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आयपीओबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे गुंतवणूकदारांना आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी पैशांचे नियोजन आतापासून करता येऊ शकते.
ब्लूमबर्गने याबाबत एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओबाबत एक रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टनुसार एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओची इश्यू प्राईज 100 रुपये (1.18 डॉलर) प्रति शेअर असण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनी आपल्या सल्लागारांशी चर्चा करत आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 10000 कोटी रुपये उभे करणार आहे. आगामी 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या काळात एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ येण्याची शक्यता आहे. या कंपनीने आयपीओसाठी किंमत पट्टा (प्राईस बँड) अद्याप निश्चित केलेला नाही. सध्या ही कंपनी त्यावर चर्चा करत आहे.
तत्पूर्वी भांडवली बाजार नियामक सेबीने एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओला ऑक्टोबर महिन्यात मंजुरी दिलेली आहे. या कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये सेबीकडे आयपीओ आणण्यासाठी ड्रॉफ्ट पेपर दाखल केला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी पॉवर जनरेशन करणाऱ्या एनटीपीसी या कंपनीची उपकंपनी आहे. एनटीपीसी ग्रीन एन10र्जीचा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. म्हणजेच ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून सर्व फ्रेश शेअर्स जारी केली. गुंतवणूकदार आयपीओच्या माध्यमातून आपली हिस्सेदारी विकणार नाहीत.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओतून मिळालेल्या 10,000 कोटी रुपयांपैकी 7500 कोटी रुपये कर्जफेडीसाठी वापरणार आहे. उर्वरित रक्कम कार्यालयीन काम तसेच कंपनीचा विस्तार करण्यासाठी वापरली जाईल. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओचे काही शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना राखीव ठेवण्यात आले आहेत. ही कंपनी आयपीओनंतर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजावर सूचिबद्ध होणार आहे.
हेही वाचा :
बँकेत नोकरी हवीय का? 1500 पदांसाठी भरती प्रकिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास
Rupee Record Low: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण, आता 1 डॉलर 84.23 रुपयांना
अधिक पाहा..