Gold Silver Price: चालू वर्षात सोन आणि चांदी या धातूने नवा विक्रम रचला आहे. त्यानंतर आता गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. हे दोन्ही मौल्यवान धातू तुलनेने स्वस्त झाले आहेत. अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर अमेरिकेचे चलन डॉलरमध्ये तेजी आली आहे. दुसरीकडे वायदा बाजारात मात्र सोने आणि चांदीचा दर कमी होताना दिसतोय. आता लग्नसराई चालू झाली आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. फक्त सोन्याचाच विचार करायचा झाल्यास गेल्या पंधरा दिवसांत सोनं तब्बल 5700 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 74500 रुपयांपर्यंत खाली आला होता. तर चांदी हा धातू गेल्या 15 दिवसांत तब्बल 11 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे चांदीचा दर 89 हजार रुपयांपर्यंत खाल आला आहे.गुरुवारी सोने 900 रुपयांनी तर चांदी 1800 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
206 कोटींच्या महत्त्वाच्या आयपीओला ब्रेक, अनेक तक्रारी आल्यानंतर सेबीचा निर्णय!
'या' पाच स्टॉक्सचा शेअर बाजारात धमाका! भविष्यात देणार 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स!