Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही
esakal November 15, 2024 04:45 PM

Stock Market Closed on 15th November: आज शुक्रवारी (15 नोव्हेंबर) शेअर बाजार बंद आहेत. गुरु पर्व म्हणजेच श्री गुरु नानक जयंती देशभरात साजरी केली जात आहे. त्यामुळे आज बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) वर कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

स्टॉक एक्स्चेंजने एक परिपत्रक जारी करून ही घोषणा केली होती. आज शुक्रवारच्या सुट्टीनंतर शनिवार आणि रविवारी बाजारात वीकेंडची सुट्टी असेल, त्यामुळे या वेळीही शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

शीख धर्माची स्थापना करणारे संत गुरू नानक यांच्या जन्मदिनी गुरु नानक जयंती साजरी केली जाते. 1469 मध्ये जन्मलेले गुरु नानक देव हे शिखांच्या दहा धार्मिक गुरूंपैकी पहिले मानले जातात.

आज शुक्रवारी आणि BSE वर स्टॉक, डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिक्युरिटी लेंडिंग आणि बोरोइंग सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार नाही. परंतु कमोडिटी मार्केटमध्ये MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) संध्याकाळी ट्रेडिंग सत्र 5 ते 11:30/11:55 पर्यंत उघडेल.

येणाऱ्या सुट्ट्यांवर नजर टाकली तर पुढच्या आठवड्यातही बाजार एक दिवस बंद राहतील. म्हणजे पुढच्या आठवड्यात सुद्धा फक्त 4 दिवस ट्रेडिंग असेल.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) महाराष्ट्रात शुक्रवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. NSE ने सांगितले की, "महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमुळे 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुट्टी असेल"

यानंतर, पुढील सुट्टी 25 डिसेंबर रोजी असेल जेव्हा बाजार पुन्हा एकदा बंद राहणार आहे. या तारखेला ख्रिसमसच्या निमित्ताने बाजारपेठा बंद राहतील.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.