हडपसरमधील जुन्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर घराला आग लागली. अग्निशामक दलाने वेळीच घरातील लोकांना बाहेर काढले. वैभव टाकीज परिसरातील घराला आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Eknath Shinde Live: पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदेमुख्यमंत्री एकनाथ यांनी महायुतीला बहुमत मिळणार असून पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही असे विधान केले आहे.
Devendra Fadnavis Live: 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा चुकीची नाही असं म्हटल आहे. आपण जाती-धर्मात विभागलो गेलो तर दुसरं कुणीतरी आपल्यावर राज्य करले असं फडणवीस म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने येणार असल्याचेही त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Pune Live: महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजनपुण्यात महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले आहे
संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यकर्त्या मेळावा घेण्यात येणार आहे
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे
Pune Live: मुठा नदीपात्रात आढळला ज्येष्ठ महिलेचा मृतदेहकामगार पुतळा परिसरातील मुठा नदीच्या पात्रात गुरुवारी (ता. १४) ज्येष्ठ महिलेचा मृतदेह आढळून आला. रेल्वेने धडक दिल्यामुळे महिलेचा मृतदेह रेल्वे रुळावरून खाली पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
Sanjay Raut: संजय राऊतांच्या वाढदिवसानिमित्त १५ किलो केकशिवसेना नेते संजय राऊत याचा वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते यांनी १५ किलो केक आणला
Nagpur: गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क- नागपूर जिल्ह्यात गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क...
- नागपूर ग्रामीणमधील अतिदुर्गम भागातील मतदारांनी निवडून आयोगाने घरापर्यंत पोहचून दिली मतदानांची संधी...
- नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ४३७ मतदार गृह मतदान करणार
Mumbai Live: गोरेगाव विधानसभेत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?गोरेगाव विधानसभेत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
उमेदवार विद्या ठाकूर आणि त्यांच्या घराणेशाहीवर शिवसेना शिंदे गट आणि हिंदू संघटना नाराज
विधानसभेत विद्या ठाकूर यांना पराभूत करण्याचा उत्तर पश्चिम लोकसभा संघटक मिलिंद कापडे यांचा इशारा