मतभेद असले तरी भाजप कार्यकर्त्यांशी बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, गुंडागर्दी रोखण्यासाठी साथ द्या
डॉ. कृष्णा केंडे November 15, 2024 05:13 PM

Uddhav Thackeray : सिल्लोडमधील (Sillod) हुकुमशाही, गुंडागर्दी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेत असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असं आवाहन करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सिल्लोडमध्ये भाजप बरोबर नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. गद्दारांना पाडा, चौकशी करु, भयमुक्त करुयाच करता ही निवडणूक असल्याच्या दावा ठाकरे यांनी केला.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका

कर्नाटकमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला होता. त्याच पद्धतीने सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी मंत्री सत्तार यांच्यावरील जमिनी बळकावणाऱ्याच्या आरोपाची यादीही वाचून दाखवली. जमीन बळकावली. भूखंड बळकावले. शासकीय मालमत्ता  याबाबतच्या यादीचं करायचे काय?  याबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल असे ठाकरे म्हणाले. 40  गद्दार तसेच मंत्रीपद देऊनही यांची भूकच शमत नाही. या लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळं सत्ता आल्यास चौकशी करुन तुरुंगात टाकल्याशिवाय राहणं असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

 मतभेद असतील तर मी भाजपच्या कार्यकर्त्यांशी बोलायला तयार

सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. मतभेद असतील तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. पण ही संधी आहे. सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या पराभवासाठी प्रयत्न करायला हवेत. शिवसेनेची संस्कृती, विचार वेगळे आहेत. सभेत मुस्लिम भगिनी बसल्या आहेत. सत्तार यांनी जमीन बळकावल्या. भूखंड पळवले. शासकीय मालमत्तांचा दुरुपयोग केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.  व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर भिंत बांधली, सर्वे नंबर 92 अनाधिकृत भूखंड ताब्यात घेतल्याचे ठाकरे म्हणाले.

गुंडागर्दी, दहशतीचे वातावरण रोखण्यासाठी साथ द्या

गेल्या वेळी माझी चूक झाली. या लोकांनी गोरगरीबांची झोप उडवली आहे. आता सर्वसामान्य माणसे एकवटत आहेत, त्यामुळं ही संधी सोडू नका. गुंडागर्दी, दहशतीचे वातावरण रोखण्यासाठी साथ द्या असे उद्धव ठाकरे म्हणाले. सोयाबीनला भाव नाही.  आम्ही सोयाबीनला 7000 चा भाव दिल्याशिवाय राहमार नाही असेही ते म्हणाले. गद्दाराला हमी भाव आहे. शेतकरी व शेतमजुरांना हक्काचे मिळायला हवे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.