Deglur Vidhan Sabha constituency : देगलूर मतदारसंघात जितेश अंतापूरकरांसमोर काँग्रेस आणि प्रहारचं आव्हान, कोण मारणार बाजी?
गणेश लटके November 15, 2024 05:43 PM

Deglur Vidhan Sabha constituency : विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नांदेड जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. आज आपण देगलूर विधानसभा मतदारसंघाची (Deglur Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघातून  विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर ( Jitesh Antapurkar) हे भाजपकडून मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे निवृत्ती कांबळे (Nivruti Kamble) आणि प्रहारचे सुभाष साबणे (Subhash Sabane) निवडणूक लढवत आहेत.

देगलूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत

देगलूर विधानसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातील विद्यमान आमदार  जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंगच्या आरोपनंतर अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांच्या विरोधातही काँग्रेसनं निवृत्ती कांबळेंना तर प्रहारने सुभाष साबणेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.  

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय स्थिती होती?

2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते. ते 89 हजार 400 मताधिक्य मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 560 मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे यांना 13 हजार 300 इतकी मते मिळाली होती.  मात्र, त्यानंतर 2021 मध्ये आमदार अंतापूरकर यांचं निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत अंतापूरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर हे विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या  सुभाष साबणेंचा त्यांनी पराभव केला होता. 

देगलूर विधानसभा मतदारसंघ हा एससी (अनुसूचित जाती) वर्गासाठी आरक्षित आहे. या सीटवर सुमारे 22 टक्के दलित मतदार आहेत. आदिवासी समाजाचे मतदान सुमारे 9 टक्के आहे. मुस्लिम समाजाचे मत शेअर 12 टक्क्यांच्या आसपास आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांची तुलना केली असता, ग्रामीण मतदार 78 टक्के आहेत, तर शहरी मतदार 22 टक्के आहेत. यामुळे या क्षेत्रात जातीय आणि सामाजिक गटांचे समीकरण महत्त्वपूर्ण ठरते.

Nanded Assembly Election : नांदेड जिल्ह्यातल्या 9 मतदारसंघाचं चित्र स्पष्ट, बंडखोरांमुळं रंगत वाढली, कोण मारणार बाजी?

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.