'बिग बॉस 18' मध्ये (Bigg Boss 18) रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस गेम अधिक रोचक होत जात आहे. विवियन-करणवीर मेहरा , अविनाश-दिग्विजय यांसोबतच आता चाहत आणि रजतमध्ये देखील मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत.
शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये (Rajat Dalal) आणि चाहतमध्ये (Chahat Pandey) भांडण पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता की ते दोघे एकमेकांना टोमणे मारत आहेत. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रजत चाहतला बोलतो की, "ही सर्व तुझ्या कर्माचे फळ आहे." यावर चाहतला खूप राग येतो आणि त्यांच्यात वाद सुरू होतो. रजतला बोलते की, "तू गप्प बस. तू काय करतोस? ट्विटरवर वर जेव्हा तू ट्रेंड करत होतास तेव्हा ते देखील तुझ्या वाईट कर्मांचे फळ होते." त्यावर रजत बोलतो की, "जेवढं तुझं डोक आहे, तसेच तुझ्यासोबत होणार आहे." यावर चाहत भडकून बोलते की,'तेरा-मेरा' करून बोलू नकोस. जो प्रेमाने बोलेल त्याला प्रेम मिळेल आणि द्वेषाने बोलणाऱ्याला भैस की पूछ..."
या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी करणवीर मेहरा, रजत दलाल, दिग्विजय राठी, चुम दारंग, श्रुतिका अर्जुन, कशिश कपूर आणि तिजेंदर बग्गा हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यातून आता कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच टाइम गॉडसाठी रजत दलाल, शिल्पा शिरोडकर आणि चाहत पांडे यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे.