मुंबई : लॅमोसेक इंडियाचा आयपीओ (Lamosek India IPO) पुढील आठवड्यात 21 नोव्हेंबरपासून बोलीसाठी उघडणार आहे. कंपनीने आपल्या आयपीओसाठी प्राइस बँड देखील जाहीर केला आहे. लॅमोसेक इंडियाने प्रति शेअर 200 रुपये किंमत बँड निश्चित केली आहे. पुढील आठवड्यात सुरू होणारा एसएमई विभागातील हा दुसरा आयपीओ असेल. याआधी, सी2सी अॅडव्हान्स्ड सिस्टम (C2C Advanced SystemsIPO) चा आयपीओ बोलीसाठी उघडेल.
इतके शेअर्स विक्रीलालॅमोसेक इंडियाचा आयपीओ 21 ते 26 नोव्हेंबर दरम्यान खुला असेल. शेअर्सचे लिस्टिंग एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर 29 नोव्हेंबर रोजी होऊ शकते. लॅमोसेक इंडिया आयपीओमध्ये 30.6 लाख शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहे. हे पूर्णपणे नवीन शेअर्स असतील. म्हणजेच यातून मिळणारी संपूर्ण रक्कम कंपनीच्या खात्यात जाईल. यातून सुमारे 61.2 कोटी रुपये उभारण्याची त्यांची योजना असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
लॉट आकारआयपीओमध्ये बोली लावण्यासाठी किमान लॉट आकार 600 शेअर्स आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान 1,20,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर एचएनआयसाठी किमान लॉट आकाराची गुंतवणूक 2 लॉट (1,200 शेअर्स) आहे, जी 2,40,000 रुपये आहे.सध्या ग्रे मार्केटमध्ये या शेअरचा प्रीमियम शून्य रुपये आहे
निधीचा वापर आयपीओ दस्तऐवजानुसार लॅमोसेक इंडिया काही कर्जाची परतफेड करण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अजैविक वाढीच्या संधी शोधण्यासाठी आणि इतर सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर करेल.
कंपनीची उत्पादनेमुंबई मुख्यालय असलेली कंपनी फ्लश डोअर्स, डेकोरेटिव्ह लॅमिनेट, ॲक्रेलिक शीट्स, प्रिंटिंग पेपर (बेस) आणि प्लायवुड यांसारख्या उत्पादनांमध्ये व्यवहार करते. कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत उत्पादन सुरू केले. कंपनी आपली उत्पादने B2B ग्राहकांना लॅमोसेक या ब्रँड नावाने विकते.