Amit Shah, Nanded : "एकीकडे विकास करणारी नरेंद्र मोदींची महायुती आहे. तर दुसरीकडे सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबच्या मांडीवर बसणारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी आहे. या दोघात तुम्हाला तुमचा प्रतिनिधी निवडायचा आहे. यामध्ये सारखं क्रॅश होणारं राहुल बाबा नावाचं विमान देखील आहे", असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते उमरेड येथील सभेत बोलत होते.
अमित शाह म्हणाले, वर्धा नांदेड रेल्वे योजना या 5 वर्षात पूर्ण करणार आहोत. नदी जोड पारियोजना मध्ये पैनगंगा नदीचा समावेश करून सिंचन व्यवस्था वाढविणार आहोत. नागपूर मुंबई समृद्धी मार्ग उमरखेडला जोडण्याचे काम करणार आहोत. उद्धवजी ओरिजनल शिवसेना औरंगाबादचे नाव संभाजी नगर करण्यास विरोध करू शकत नाही. तुमची सेना आता उद्धव सेना झाली आहे. खरी शिवसेना भाजपसोबत आहे.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, राहुल बाबा आणि त्यांची पार्टी पुन्हा 370 कलम लागू करणार आहे. काश्मीर भारतचा अभिन्न अंग आहे. काश्मीरला दुनियेची कुठलीही ताकत तोडू शकत नाही. मोदींनी प्रधानमंत्री बनल्यानंतर सेनेचे मनोबल वाढविले. आतंकवादी हल्ला होताच पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केला.
नाना पटोलेंना उलेमा भेटले. तुम्हाला वोट देऊ पण आमचे काम करा. मौलानाला प्रत्येक महिन्यात 15 हजार द्यावे लागतील. Sc, st, ओबीसीचे रिझर्वेशन समाप्त करून मुसलमानांना आरक्षण देणार आहेत. मशीदींना एक हजार कोटी रुपये देतील. उद्धव राम मंदिरात जात नाहीत, उलट मशीदींना एक हजार करोड देण्याची गोष्ट करतात, असंही शाह म्हणाले.
सोनिया-मनमोहन सिंह यांचं सरकार होतं. आंतकवादी रोज भारतात हल्ले करत होते. हजारो लोकांना मारत होते. सोनिया आणि मनमोहन वोट बँकेच्या नादात आवाज काढत नव्हते. मोदीजींनी सैन्याचं मनोबल वाढवलं. मोदींच्या सरकार आल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला, असंही शाह यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Supriya Sule : 'तर कोर्टात खेचेन', सुनील टिंगरेकडून शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट