हिवाळयात आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. बदलत्या हवामानामुळे आपल्या त्वचेत अनेक बदल घडत असतात. थंड हवामानामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो आणि ती कोरडी आणि निस्तेज होते. बऱ्याचदा आपण बाहेरील मॉइश्चराइजचा वापर करतो. त्या मॉइश्चराइजमध्ये अनेक केमिकल्स मिसळलेलं असतात या केमिकल्समुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. या समस्या उद्भवू नये यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
अशा प्रकारे तुमची स्किन हाइड्रेट राहील. तसेच तुम्ही इतर घरगुती उपाय देखील करू शकता.
– जाहिरात –
नारळाचे तेल लावल्यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून राहतो. अंघोळीनंतर तुम्ही नारळाच तेल लावल्याने स्किन चांगली मॉइश्चरायझर होईल.
गायीच्या तूपाने हलक्या हाताने मालिश केल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होईल. हे अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय आहे.
– जाहिरात –
एलोवेरा जेल त्वचा हायड्रेट ठेवायला मदत करते. तुम्ही स्किन मॉश्चराइज करण्यासाठी देखील एलोवेरा जेल वापरू शकता.
२ चमचे दूध आणि १ चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते.
हेही वाचा : Winter Beauty Tips : हिवाळ्यात त्वचा मऊ राहण्यासाठी या टिप्स करा फॉलो
संपादन : प्राची मांजरेकर