आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर पडत असतो. इतकंच नाही तर आपल्या खाण्यापिण्याचा परिणामही आपल्या त्वचेवर आणि लूकवर पडत असतो. यामुळेच नेहमी हेल्दी डायट फॉलो करणं गरजेचं आहे. कारण यामुळे अनेक आजार दूर पळू शकतात. एक अॅक्टिव लाइफस्टाईल आणि हेल्दी डायट हेच आरोग्यदायी जीवनाचे सिक्रेट आहे. परंतु बदलत्या काळानुसार असे काही अन्नपदार्थ प्रचलित होऊ लागले आहेत. ज्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यांचे सेवन आरोग्याला अनेक बाबतीत नुकसान पोहोचवू शकते. परंतु तरीही लोक अगदी आवडीने हे पदार्थ खातात.
याचा परिणाम असा होतो की व्यक्ती वयाआधीच वृद्ध दिसू लागते. तर योग्य डायट फॉलो करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या वयापेक्षा लहान दिसतात. अशात आपलं भलं यातच आहे की याप्रकारच्या अन्नपदार्थांपासून आपण दूर रहायला हवं. जाणून घेऊयात असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे आपल्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात? आणि वय वाढण्याची प्रक्रिया जलद करतात.
हे शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे इम्फ्लेमेशन होतं आणि त्वचेवर मुरुमे व सुरकुत्या दिसायला सुरुवात होते.
हे शरीरातील पाण्याची मात्रा अधिक वाढवतं ज्यामुळे त्वचा पफी दिसू लागते. यामुळे त्वचेचा लवचीकपणा निघून जातो. आणि फाइन लाइन्स व सुरकुत्या दिसू लागतात.
कॅफिनयुक्त कॉफी किंवा चहा प्यायल्याने त्वचेवरचा मुलायमपणा कमी होतो. यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. ज्यामुळे ती कोरडी दिसते. आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
फ्रेंच फ्राईज, प्रोसेस्ड फूड किंवा फास़्ड फूड ज्यामध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रांसफॅट अधिक असतं ते स्किन इंफ्लेमेशन वाढवते आणि त्वचेचा लवचिकपणा कमी करते. यामुळे वृद्धत्व लवकर येते.
हे पदार्थ त्वचेला डिहायड्रेट करतात. त्वचेच्या हील होण्याच्या क्षमतेला कमी करतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या कमी जाडीच्या होतात. आणि त्वचेवर लालसरपणा दिसू लागतो. यामुळे त्वचा कोरडी होते आणि त्वचेवर फाइन लाइन्स दिसू लागतात.
हेही वाचा : Anjeer Benefits : अंजीर खाण्याचे अनेक फायदे
संपादन- तन्वी गुंडये