विषारी हवा आणि संसर्गापासून वाचवतील व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली फळे
GH News November 15, 2024 11:11 PM

प्रदूषणाची समस्या सध्या सर्वत्र वाढली आहे. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. विशेषतः दिल्ली एनसीआर मध्ये परिस्थिती बिकट होत चालली आहे. राजधानीतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून येथील नागरिकांना विषारी हवेचा श्वास घ्यावा लागतो आहे. अशा परिस्थितीत गुदमरणाऱ्या हवेत श्वास घेतल्याने अनेक आजार लोकांना बळी पाडत आहेत. तसेच थंडीच्या काळात सिजनल फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढू लागलेत अशा परिस्थितीत बिघडलेल्या परिस्थितीत आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

जर तुम्ही देखील अशा ठिकाणी राहत असाल जिथे हवा तुमचा श्वास गुदमरत असेल आणि तुम्हाला हिवाळ्यात विषाणून पासून वाचायचे असेल तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ समाविष्ट करा. व्हिटॅमिन सी हे मुख्यतः आंबट फळांमध्ये आढळणारे एक आवश्यक जीवनसत्व आहे. हे एक अँटिऑक्सिडंट आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती राखण्यात महत्त्वाची भूमिका बचावते. जाणून घेऊया अशाच व्हिटॅमिन सीने समृद्ध फळांबद्दल.

किवी

किवी रक्तातील प्लेटलेट्स रोखू शकते ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. एवढेच नाही तर किवी तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन के आणि न्यूटन प्रदान करते.

पेरू

पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट लायकोपिन चांगल्या प्रमाणात आढळते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की सहा आठवडे दररोज 400 ग्राम पेरू खाल्ल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास खूप मदत होते.

केळी

जर तुम्ही व्हिटॅमिन सी समृद्ध अन्नशोधत असाल तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. एक कप शिजवलेल्या केळीमध्ये 21 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते. त्याशिवाय हे व्हिटॅमिन के आणि अँटिऑक्सिडंटचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

लिंबू

लिंबू व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. एका संपूर्ण कच्च्या लिंबामध्ये 45 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते जे आहारात समाविष्ट केल्यावर शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करते. हे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. लिंबू रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात देखील मदत करते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.