Mangalsutra Designs: साडीनुसार करा मंगळसूत्राची फॅशन,पाहणाऱ्यांची नजर हटता हटणार नाही
Times Now Marathi November 15, 2024 11:45 PM

According to Saree: भारतीय महिला पारंपारिक समारंभात आजही साडी परिधान करण्यास प्राधान्य देतात. सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून, या काळात वेगवेगळ्या समारोहात आकर्षक दिसण्यासाठी प्रत्येक महिला प्रयत्न करत असते. खास करून नवविवाहित मुली पाहुण्यांमध्ये सुंदर दिसण्यासाठी विशेष तयारी करते. आकर्षक साडीबरोबरच अनुरूप केशरचना आणि शृंगार केला जातो. मग अशावेकी प्रत्येक साडीवर तेच ते मंगळसूत्र का? तुम्ही साडीच्या प्रकारानुसार मंगळसुत्रांची फॅशन करून आपला लूक आणखीनच आकर्षक करू शकतात.

आपल्याकडे साड्यांचे विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील, त्या साडीनुसार दागिन्यांची निवड करणे महिलांना चांगलेच जमते. पण जेव्हा मंगळसूत्र परिधान करण्याची वेळ येते, तेव्हा नेहमीचेच मंगळसूत्र घातले जाते. पण जर तुमचा लूक तुम्हाला परफेक्ट करायचा असेल तर साडीला सूट होईल, आणि तुमच्या एकंदरीत लूकला शोभून दिसेल असे अनुरूप मंगळसूत्र परिधान करण्यास काय हरकत आहे? चला तर मग येत्या समारंभासाठी तयार होताना कोणत्या साडीवर कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र शोभून दिसेल याबद्दल जाणून घेऊयात.

साडीवर अनुरूप करा मंगळसूत्राची फॅशन

अशीही कोणतीही भारतीय महिला आढळणार नाही, की तिच्या वॉर्डरॉबमध्ये साड्यांचे कलेक्शन नसेल. आपल्यापैकी बऱ्याचजणीकडे साड्यांचे विविध प्रकार असतील, जसे की सिल्क, कॉटन, इरकल, ऑर्गेन्झा इ.. यांपैकी कोणती साडी कोणत्यावेळी घालायची हे महिलांना चांगलेच माहीत असते. शिवाय साडीवर अनुरूप ब्लाऊज आणि परकर देखील तयार असतोच. मग यासोबतच साडीवर शोभून दिसेल असे अनुरूप मंगळसूत्र देखील आजपासून कॅरी करायला लागा. कारण जर तुम्हाला इतरांमध्ये उठून दिसायचे असेल, आणि सर्वाचे लक्ष तुमच्याकडे वेधून घ्यायचे असेल तर हे डिझाईनर मंगळसूत्र तुम्हाला मदत करू शकतील.

कोणत्या साडीवर कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र घालायचे?


साडी परिधान करायची म्हंटली तर साड्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स ते पॅटर्नपासून सर्वकाही तपासले जाते. अगदी दागिने देखील त्या पद्धतीने खरेदी केल्या जातात. मग, अशावेळी तुम्ही मंगळसूत्रदेखील परिधान करू शकतात. जसे की-

ऑर्गेन्झा साडी पार्टी वेअर


ही साडी आजकाल प्रचंड ट्रेंड मध्ये आहे. या लाइटवेटच्या साड्या नवविवाहितच काय तर महाविद्यालयीन मुली देखील परिधान करणे पसंत करतात. या साडीवर खूप ग्लॅमरस लूक येतो. तसेच या साडीत व्यक्तिमत्व देखील खूप आकर्षक दिसून येते. त्यामुळे ही साडी पार्टी वेअर तसेच इतर कौटुंबिक कार्यक्रमासाठी मस्त निवड ठरते. तुम्ही देखील आगामी कार्यक्रमासाठी ऑर्गेन्झा साडी परिधान करणार असाल, तर टयावर एडचे मंगळसूत्र किंवा डायमंड मंगळसूत्र सुंदर दिसून येईल. यासाठी तुम्ही काही बॉलिवूड अभिनेत्रींचे डायमंड मंगळसूत्र डिझाईन्सची कॉपी करू शकतात.

सिल्क साडी



लग्न समारंभात तसेच धार्मिक कार्यक्रमात सिल्क साड्यांचे प्रकार अजरामर आहेत. ज्यामध्ये तुम्ही पैठणीपासून ते कांचीपुरम कोणत्याही साडीचा समावेश करू शकतात. सिल्क साड्या खास करून काठपदर असलेल्या या साड्यांवर सोन्याचे पारंपारिक मंगळसूत्र चांगले दिसून येते. सोनेरी मंगळसूत्रामध्ये तुम्हाला हवे डिझाईन्स मिळून जातील.

खण साडी



इरकल, खण तसेच सूती साडी परिधान करण्यास एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. या साड्या अंगावर चांगल्या बसतात, आणि आरामदाई देखील असतात. या साड्या आधुनिक आणि अभिजात दर्जा मिळवून देतात. त्यामुळे तुम्ही जर यांपैकी एक साडी परधान करणार असाल तर ऑक्सडाईज मंगळसूत्राचा विचार करू शकतात. ऑक्सडाईज मंगळसूत्रमध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळून जातील.

तर मग अशाप्रकारे तुम्ही साडीवर मंगळसूत्राची वेगवेगळी स्टाइल करून स्वात:चा साडी लूक आकर्षक बनवू शकतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.