भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील आगामी 5 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेला काही दिवस उरले आहेत. मात्र, त्याआधी भारतीय फलंदाजीबाबत चाहत्यांच्या मनात अनेक शंका नक्कीच असतील. न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत ज्याप्रकारे भारतीय खेळाडू अपयशी ठरले आणि त्यानंतर संघांतर्गत सामन्यादरम्यान जी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे भारतीय संघाचा तणाव नक्कीच वाढला असेल. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा चिंताग्रस्त फाॅर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनू शकतो.
१) विराट कोहली- भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) न्यूझीलंड कसोटी मालिकेतही पूर्णपणे फ्लॉप ठरला. पण आता ऑस्ट्रेलियातील सराव सामन्यातही तो विशेष काही करू शकला नाही. त्याने शानदार 2 कव्हर ड्राईव्ह मारले आणि त्यानंतर तो मुकेश कुमारच्या (Mukesh Kumar) चेंडूवर स्लिपमध्ये बाद झाला. कोहलीला केवळ 15 धावा करता आल्या. पण सध्या ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये कोहलीची बरीच चर्चा होत आहे.
2) यशस्वी जयस्वाल- भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पर्थ कसोटी सामन्यादरम्यान उपलब्ध नसेल. अशा स्थितीत युवा फलंदाज यशस्वी जयस्वालवर (Yashasvi Jaiswal) सलामीची मोठी जबाबदारी असेल. मात्र, सराव सामन्यादरम्यान तो स्लिपमध्ये बाद झाला. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर तो जास्त धावा करू शकला नाही आणि केवळ 15 धावा करून तंबूत परतला.
३) शुभमन गिल- न्यूझीलंड कसोटी मालिकेतही शुबमन गिलची (Shubman Gill) बॅट चमकली नाही. त्याला केवळ एकदाच मोठी खेळी करता आली. त्यानंतर उर्वरित सामन्यांमध्ये तो अर्धशतकही देखील करू शकला नाही. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सराव सामना खेळला गेला, तेव्हा गिल केवळ 29 धावा करून तंबूत परतला. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने (Navdeep Saini) त्याला तंबूत पाठवले.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA; भारताने जिंकला टाॅस प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवलं, या स्पर्धेत सांभाळणार महत्त्वाची जबाबदारी
“बुमराह सर्व 5 कसोटी सामने खेळेल असं वाटत नाही”, माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक वक्तव्य