Palghar District Assembly Election 2024 : पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, डहाणू आणि बोईसर हे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये पालघर, बोईसर, विक्रमगड आणि डहाणू हे चार विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. यंदा पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी विजय मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. सर्वपक्षीय नेते जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता कुणाला कौल देणार हे पाहावं लागणार आहे.
क्र. | मतदारसंघ | प्रमुख लढती | |
128 | डहाणू | विनोद निकोले (माकप) | विनोद मेढा (भाजप) |
129 | विक्रमगड | सुनील भुसारा (राष्ट्रवादी – एसपी) | हरिश्चंद्र भोये (भाजप) |
130 | पालघर | जयेंद्र दुबळा (शिवसेना- यूबीटी) | राजेंद्र गावीत (शिवसेना) |
131 | बोईसर | डॉ. विश्वास वळवी (शिवसेना- यूबीटी) | विलास तरे (शिवसेना) |
132 | नालासोपारा | संदीप पांडे (काँग्रेस) | राजन नाईक (भाजप) |
133 | वसई | विजय गोविंद पाटील (काँग्रेस) | स्नेहा दुबे (भाजप) |
2019 मध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विक्रमगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस सुनिल भुसारा, पालघरमधून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, बोईसरमधून बहुजन वंचित आघाडीचे राजेश पाटील, नालासोपारा बहुजन वंचित आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि वसईमधून बहुजन वंचित आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे विजयी उमेदवार होते.
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
डहाणू | पास्कल धनारे (भाजप) | विनोद निकोले (माकप) | विनोद निकोले (माकप) |
विक्रमगड | हेमंत सावरा (भाजप) | सुनिल भुसारा (राष्ट्रवादी) | सुनिल भुसारा (राष्ट्रवादी) |
पालघर | श्रीनिवास वनगा (शिवसेना) | योगेश नम (काँग्रेस) | श्रीनिवास वनगा (शिवसेना) |
बोईसर | विलास तरे (शिवसेना) | राजेश पाटील (बविआ) | राजेश पाटील (बविआ) |
नालासोपारा | प्रदीप शर्मा (शिवसेना) | क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी) | क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी) |
वसई | विजय पाटील (शिवसेना) | हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी) | हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी) |