टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चौथ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात विजयासाठी 284 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी नाबाद शतक ठोकलं. दोघांनी केलेल्या या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 विकेट्स गमावून 283 धावा केल्या. भारताची ही परदेशातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच टीम इंडियासाठी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी कोणत्याही विकेटसाठी विक्रमी आणि नाबाद भागीदारी केली. दोघांनी 93 बॉलमध्ये नॉट आऊट 210 रन्सची पार्टनरशीप केली. आता दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज या आव्हानाचा पाठलाग करताना किती धावांपर्यंत मजल मारतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.