Champions Trophy – ICC ने पाकिस्तानला ठणकावले, PoK मध्ये ट्रॉफी नेण्यास मनाई
Marathi November 16, 2024 01:24 AM


चॅम्पियन्स ट्रॉफीचे पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पाकिस्तान शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. अशातच स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चॅम्पियन्स “ट्रॉफी” पाकिस्तानात दाखल झाली आहे. ICC च्या इतिहासात स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ट्रॉफी यजमान देशात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ. मात्र, याच बरोबर ICC ने पाकिस्तानला ठणकावत चॅम्पियन्स ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Pok) घेऊन जाण्यास मनाई केली आहे.



पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी आर्थिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे स्पर्धा यशस्वी आणि भव्यदिव्य करण्यासाठी पाकिस्तान सराकराने पुढाकार घेत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा धमाका सुरू होणार आहे. त्यासाठी आयसीसीने चॅम्पियन्स “ट्रॉफी” स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानात पाठवून दिली आहे. एकीकडे ट्रॉफीच्या येण्यामुळे पाकिस्तानात आनंदाचे वातवरण होते. मात्र, दुसरीकडे ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जाण्यास मनाई केल्यामुळे पाकिस्तानला झटका बसला आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने ट्रॉफी येण्यापूर्वीच ट्रॉफी संपूर्ण पाकिस्तानात फिरवण्याचे सर्व नियोजन केले होते. 16 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ट्रॉफी संपूर्ण पाकिस्तानात फिरवण्यात येणार होती. त्याच बरोबर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर K2 वर सुद्धा ट्रॉफी घेऊन जाण्यात येणार आहे.

ट्रॉफीच्या या प्रभात फेरीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील स्कार्दू, मुरी आणि मुझफ्फराबाद या शहरांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, बीसीसीआयने यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आयसीसीने या संदर्भात निर्णय घेतला आणि पाकिस्तानला ठणकावून सांगीतले की, ही ट्रॉफी तुम्हाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा हादरा मानला जात आहे. तसेच टीम इंडिया पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार नसल्याचे बीसीसआयने यापूर्वीच जाहीर केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.