India vs South Africa 4th T20I: दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाच्या निर्धाराने चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात मैदानावर उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी धावांचा एव्हरेस्ट उभा केला. संजू सॅमसन ( Sanju Samson) व तिलक वर्मा ( Tilak Varma) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी दोनशेपार भागीदारी करून आफ्रिकेच्या गोलंदाजांना रडवले.
दोघांनी शतक झळकावताना संघाला २० षटकात १ बाद २८३ इतकी मोठी धावसंख्या उभारून दिली. एका वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३ शतक झळकावणारा संजू हा जगातील पहिला फलंदाज ठरला. तेच तिलकनेही सलग दुसरे शतक झळकावून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सलग दोन शतके करणाऱ्या दुसऱ्या (पहिला संजू) भारतीय फलंदाजाचा मान मिळवला.
अभिषेक शर्माने १८ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ३६ धावांची वादळी खेळी करून भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने संजूसह पहिल्या विकेटसाठी ५.५ षटकांत ७३ धावा जोडल्या. त्यानंतर संजू सॅमसन व तिलक वर्मा ही वादळं घोंगावली.
एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन शतकं झळकावणारा संजू पहिलाच फलंदाज ठरला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना तिलकचा सोपा झेल सुटला होता. त्यानंतर त्याने शतक पूर्ण केले, तत्पूर्वी संजूनेही आपली शतकी खेळी साकारली.
संजू ५६ चेंडूंत ६ चौकार व ९ षटकारांसह १०९ धावांवर नाबाद राहिला, तर तिलकनेही ४७ चेंडूंत ९ चौकार व १० षटकारांसह १२० धावांची नाबाद खेळी करून संघाला १ बाद २८३ धावांपर्यंत पोहोचवले.
भारतीय फलंदाजांनी या सामन्यात २३ षटकार खेचले, जे कसोटी खेळण्याचा मान असलेल्या देशांमधील ट्वेंटी-२० डावातील सर्वाधिक ठरले. संजू व तिलक यांनी ८६ चेंडूंत २१० धावांची भागीदारी केली.
त्यामुळे भारतासाठी ट्वेंटी-२० मध्ये २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी त्यांची पहिलीच जोडी ठरली. तसेच दुसऱ्या विकेटसाठी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मध्ये सर्वोच्च भागीदारी करणारी जोडी ठरली.
वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय यष्टिरक्षक ( इनिंग्ज)४३६* धावा - संजू सॅमसन ( ११), २०२४
३६४ धावा - ऋषभ पंत ( २१), २०२२
३०५ धावा- केएल राहुल ( ८), २०२०
२६८ धावा- महेंद्रसिंग धोनी ( १२ ) २०१२
४ - संजू सॅमसन (१८)
३ - केएल राहुल ( ८), इशान किशन ( १६)
२ - ऋषभ पंत ( ५४), महेंद्रसिंग धोनी ( ८५)
३ - रोहित शर्मा, संजू सॅमसन
२ - सूर्यकुमार यादव
१ - केएल राहुल, अभिषेक शर्मा व तिलक वर्मा
३२ डाव - फिल सॉल्ट
३३ डाव - संजू सॅमसन
३५ डाव - कॉलिन मुन्रो
४३ डाव - सूर्यकुमार यादव
५३ डाव - ग्लेन मॅक्सवेल
७७ डाव - रोहित शर्मा
९६ डाव - बाबर आझम
सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त तीन शतकं करणारा संजू सॅमसन हा तिसरा भारतीय फलंदाज आहे आणि त्याने सर्वात कमी डावांत हा टप्पा ओलांडला. संजूने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक तीनवेळा १७०+ धावांच्या भागीदारीत सहभाग घेतला आहे
१० षटकार - रोहित शर्मा (वि. श्रीलंका, इंदूर, २०१७)
१० षटकार - संजू सॅमसन (वि. दक्षिण आफ्रिका, डर्बन, २०२४)
१० षटकार - तिलक वर्मा (वि. दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०२४)
५ शतके - रोहित शर्मा
४ शतके - सूर्यकुमार यादव
३ शतके - संजू सॅमसन
२५८* - लचलान यामामोटो-लेक आणि केंडेल काडोवाकी, मोंग कोक, २०२४
२३६ - हजरतुल्ला झाझाई आणि उस्मान गनी, डेहराडून, २०१९
२२३ - आरोन फिंच आणि डार्सी शॉर्ट, हरारे, २०१८
२२० - सबावून डेविझी आणि डिलन स्टेन, मार्सा, २०२२
२१३ - अविनाश पै आणि लुईस ब्रुस, मार्सा, २०२२
२१०* - संजू सॅमसन आणि तिलक वर्मा, जोहान्सबर्ग, २०२४
२०३ - बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान, कराची, २०२२
२०० - काइल कोएत्झर आणि जॉर्ज मुन्से, डब्लिन, २०१९
२१०*- संजू सॅमसन आणि तिलक वर्मा वि. दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०२४
१९० - रिंकू सिंग आणि रोहित शर्मा वि. अफगाणिस्तान, बंगळुरू, २०२४
१७६ - दीपक हुडा आणि संजू सॅमसन वि. आयर्लंड, डब्लिन, २०२२
१७३ - संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव वि. बांगलादेश, हैदराबाद, २०२४
१६५ - केएल राहुल आणि रोहित शर्मा वि. श्रीलंका, इंदूर, २०१७
१६५ - यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल वि. झिम्बाब्वे , हरारे, २०२४