लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
प्रज्वल ढगे November 16, 2024 11:43 AM

मुंबई : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महीम हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. याच कारणामुळे सध्या या मतदारसंघाला महत्त्व आले आहे. अमित ठाकरेंना (Amit Thackeray) विजयी करण्यासाठी मनसेने येथे पूर्ण ताकद पणाला लावली आहे. अमित ठाकरेदेखील घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.

लहानग्या उर्वशीचे अमित ठाकरेंना पत्र 

निवडणूक जिंकण्यासाठी अमित ठाकरे माहीममध्ये पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. या प्रचारात अमित ठाकरेंच्या पत्नीदेखील त्यांच्यासोबत आहेत. हे दाम्पत्य घरोघरी जाऊन लोकांची भेट घेत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, अशाच एका घराची भेट घेतल्यानंतर एका मुलीने काका तुम्हाला आमदार व्हायचंय असा हट्ट करत एक पत्र लिहिलंय. या पत्राची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. 

तुम्ही आमदार झाले पाहीजे हा माझा हट्ट...

या मुलीने अमित ठाकरे तुम्ही आमदार व्हायचंच आहे, असा पत्राच्या माध्यमातून बालहट्ट केला आहे. आमच्या भविष्यासाठी तुम्हाला आमदार व्हावे लागेल. तसेच पुढच्या वेळी घरी येताना आमदार अमित ठाकरे म्हणून या, असा उल्लेख या पत्रात आहे. तुम्ही आमदार झाले पाहीजे हा माझा हट्ट आहे आणि तो तुम्ही पूर्ण करायाचा अशी या लहान मुलीने पत्रातून मागणी केली आहे.  

छोट्या मुलीच्या पत्रात नेमकं काय आहे?

अमित ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्याच्या घरी गेल्यानंतर अमित ठाकरे यांना एका छोट्या मुलीने पत्र दिलं. यात अमितकाका आमदार बनायचंय. आज आमच्या घरी तुम्ही अमित ठाकरे म्हणून आलात. पण पुढच्या वेळी आमदार अमित ठाकरे म्हणून या. आमच्या भविष्यासाठी काका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल. हा माझा हट्ट आहे आमि तो तुम्ही पूर्ण करायचाय. विजयी भव:... तुमचीच उर्वशी लक्ष्मण पाटील, असं या पत्रात लिहण्यात आलंय. 

दरम्यान, सध्या या पत्राची सगळीकडे चर्चा आहे. माहीम या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. येथे महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून नेमकं कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.