Prasad Oak : राज्यात अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Elections) निकाल लागणार आहे. यंदाची निवडणुकांची ही परीक्षा प्रत्येक राजकीय पक्षासाठी आणि नेत्यांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राजकीय रणधुमाळीत यंदा होणाऱ्या नात्यांच्या लढतीमध्ये अवघा महाराष्ट्र कुणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईलच. पण त्याआधी प्रचाराच्या तोफा शांत होण्याआधी मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रत्येकाचा कसोशीचा मानस आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रचाराची दिशा ठरवली जातेय. यामध्ये सेलिब्रेटींच्या प्रचारांने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. नुकतच अभिनेता प्रसाद ओकनेही (Prasad Oak) महायुतीच्या सरकारसाठी खास व्हिडीओ केला आहे.
अभिनेता प्रसाद ओक हा धर्मवीर सिनेमामुळे चर्चेत आला होता. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे.ही भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भूमिका या सिनेमात दाखवण्यात आलीये. जेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंड केलं आणि पहिला राजकीय भूकंप झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकांना काही महिनेच असताना 27 सप्टेंबर रोजी सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे या सिनेमाचं राजकीय कनेक्शन अनेकदा जोडण्यात आलं. त्यातच आता प्रसादने महायुतीच्या सरकारसाठी केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे. यामध्ये 'महायुती सरकार आहे तर टेन्शनच नाही', असं प्रसादने म्हटलं आहे.
महायुतीच्या सरकारसाठी प्रसादने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसाद या व्हिडीओच्या सुरुवातीला एका फोनवर बोलत असतो. त्यामध्ये तो म्हणतो की, शुटींग संपलं आहे, निघालोय आता, पोहचतो लवकर... तेव्हा एक व्यक्ती येऊन प्रसादला म्हणते की, सर तुम्ही निघालात... आता पोहचणार कधी..एकतर आज तुम्ही कार देखील नाही आणलीत.. त्यावर प्रसाद म्हणतो की,अरे काही टेन्शन नाही रे...आपल्या महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं सुलभ झालंय की, कुठूनही कुठेही कधीही जाता येतं आणि तेही अगदी सहज.'
पुढे त्याने म्हटलं की, '25-26 वर्ष झालीत मला मुंबईत येऊन पण गेल्या 7 वर्षात जो महाराष्ट्र मी पाहतोय, अनुभवतोय काहीतरी वेगळंय.. महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मोठा होतोय. गावागावंत हायवे पोहचले आहेत, कृषीप्रधान योजना राबवल्या जात आहेत, महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण योजनेसारख्या योजना सुरुच आहेत.. अरे महायुती आहे तर टेन्शनच नाही.'
View this post on Instagram