काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
नामदेव जगताप November 16, 2024 03:13 PM

Tom Cruise Copied Akshay Kumar: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्याचा क्लासी अंदाज, याची बात काही औरच... असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार. फिल्म इंडस्ट्री गाजवणाऱ्या टॉप अभिनेत्यांपैकी एक असलेला अक्षय कुमार (Akshay Kumar) आपला क्लासी अंदाज आणि परफेक्ट स्टंट यामुळे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. बऱ्याचदा आपल्या चित्रपटांमधील स्टंट अक्षय कुमार स्वतः करतो. पण, आता अक्षय कुमारनं स्वतःच्याच पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, मध्येच काय हे? तर, अक्षय कुमारचे स्टंट चक्क हॉलिवूडचे सेलिब्रिटी (Hollywood Celebrity) कॉपी करत असल्याचं दिसून येत आहे. हो... तुम्ही बरोबर ऐकताय... बॉलिवूडचा खिलाडी कुमार यानं केलेले स्टंट हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझनं (Tom Cruise) कॉपी केल्याचं समोर आलं आहे.  

बॉलिवूडचा ओजी प्लेयर अक्षय कुमारची कॉपी हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझने केली होती, असा दावा सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून केला जात आहे. 'मिशन: इम्पॉसिबल - द फायनल रेकनिंग'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ट्रेलरमध्ये टॉम क्रूझ करत असलेला स्टंट कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. टॉम क्रूझनं 'मिशन: इम्पॉसिबल 8'मध्ये साकारलेला स्टंट अक्षय कुमारनं तब्बल 24 वर्षांपूर्वीच केल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला. बरं नेटकरी फक्त दावा करुन थांबले नाहीत, तर त्यांनी अक्षयनं 2000 साली 'खिलाडी 420'मध्ये केलेल्या स्टंटचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर केला. 

'मिशन: इम्पॉसिबल 8' च्या टीझरमध्ये, एथन हंट (टॉम क्रूझ) क्लासिक क्रूझमध्ये विमानात हवेत लटकत आहे, जे पाहण्यात लोकांना फार थ्रील वाटला... पण आता त्यांना अक्षय कुमारच्या जुन्या स्टंटचा व्हिडीओ सापडला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी थेट डिक्लेअर करुन टाकलं की, स्वतःचे स्टंट स्वतः करण्यासाठी ओळखल्या जाणारा हॉलिवूड स्टार टॉम क्रूझनं चक्क आपल्या अक्षय कुमारचा स्टंट कॉपी केला आहे. 


टॉम क्रूझनं केली अक्षय कुमारची कॉपी 

एका Redditorनं लिहिलंय की, अक्षयनं हा स्टंट फार वर्षापूर्वी केला होता. तोच स्टंट हुबेहुब टॉम क्रूझनं केला आहे. एकानं बॉलिवूड स्टार अक्षय कुमारला 'एथन हंटची प्रेरणा' असं संबोधलं आहे. अक्षयच्या अलिकडच्या चित्रपटांच्या निवडीबद्दलही चाहत्यांनी बरंच काही सांगितलं आहे. एक नेटकरी म्हणाला की, कदाचित टॉम क्रूझमुळेच आम्हाला आणखी एका खिलाडी चित्रपटाची गरज आहे. पुरे सेल्फी आणि बच्चन पांडे. एकानं सांगितलं की, टॉम क्रूझकडे खूप बजेट आहे, पण अक्षयमध्ये हिंमत होती.

अक्षय कुमारलाही आवडतात हॉलिवूड स्टंट 

दोघांच्या स्टंटसोबतच त्यांच्या कपड्यांमध्येही साम्य दिसतंय, असं नेटकरी म्हणतात. नेटकऱ्यांनी टॉम क्रूझच्या स्टंटची प्रत्येक फ्रेम तपासून पाहिली आहे. खुद्द अक्षय कुमारनं हॉलिवूडच्या विलक्षण स्टंटवर भाष्य केलं होतं. एएनआयसोबत बोलताना अक्षय म्हणाला की, स्टंटवर खर्च करण्यात आलेली रक्कम आमच्या चित्रपटांच्या 2-3 बजेटच्या बरोबरीची आहे आणि केवळ शुटिंगचा खर्चच नाहीतर, सीन शूट करण्यासाठी खर्च केलेली रक्कमसुद्धा खूप मोठी आहे. आपण ते करु शकत नाही, असं नाही. दरम्यान, 'मिशन: इम्पॉसिबल 8' 23 मे 2025 रोजी रिलीज होणार आहे. 

पाहा Mission: Impossible 8 चा ट्रेलर : 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.