Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त
esakal November 16, 2024 05:45 PM
Pune Live: चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी प्रचारात सहभागी

चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी प्रचारात सहभागी

कोथरूड मधील मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन

Pune live: पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

पुण्यातील औंध येथील राजीव गांधी पुलावरील तपासणी नाक्यावर निवडणुकीदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अडीच किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास आणि कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.

traffic update live: सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

सातारा महामार्गावरील खांबटकी घाट परिसरात आज सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या घटनेमुळे अनेक वाहनचालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.

PM Narendra Modi LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर. ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

Maharashtra Assembly Elections LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी आज संवाद साधणार.

Priyanka Gandhi Live: काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा आज महाराष्ट्र दौऱ्यावर कार्यक्रम आहे. त्या सकाळी ११:४० वाजता शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १२:२५ वाजता राहाता तालुक्यातील साकोरी येथील दौलतबागेत जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी ५ वाजता त्या कोल्हापूरातील शिवाजी पेठेतील गांधी मैदानात जाहीर सभेसाठी उपस्थित राहतील. त्यांच्या या दौऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Maharashtra Assembly Elections LIVE : सोमवारी सायंकाळी सहापासून प्रचारास बंदी

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होणार आहे. मतदानापूर्वी ४८ तास आधी, सोमवारी (१८) सायंकाळी सहानंतर निवडणुकीच्या प्रचारास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश लागू केले आहेत. प्रचारास बंदी घातल्यानंतर प्रचार करता येणार नाही किंवा सभा घेता येणार नाही. तसेच मतदानादिवशी मतदान संपेपर्यंत बेकायदा जमाव जमवणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे, पाच किंवा पाचहून अधिक लोक एकत्र येण्यास (पूर्वनियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम वगळून व भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून) प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश मतदानाकरिता घरोघरी जाऊन भेटी देण्यासाठी लागू राहणार नाही. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात म्हटले आहे.

Assembly Elections LIVE : आचारसंहिता भंगप्रकरणी माजी जि. प. सदस्यांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ गारीवडे (ता. गगनबावडा) येथे आयोजित जाहीर सभेत माजी जिल्हा परिषद सदस्या मेघाराणी जाधव यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. भाषणामध्ये त्यांनी महिला मतदारांना धमकीवजा इशारा दिल्याने त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मेघाराणी जाधव (रा. निवडे, ता. गगनबाबडा) यांच्याविरुद्ध भरारी पथक क्र.१ चे प्रमुख उदय पाटील यांनी गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना करवीर निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा सिंघन यांनी प्राधिकृत केले होते. उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेतील भाषणात महिलांविषयी जाधव यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याची निवडणूक विभागाने गांभिर्याने दखल घेऊन ही कारवाई केली.

Priyanka Gandhi Sabha LIVE : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या सभेसाठी वाहतूक मार्गांत बदल

कोल्हापूर : ऑल इंडिया कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरी प्रियांका गांधी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शनिवारी गांधी मैदान येथे सभा घेत आहेत. शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या परिसरासह वाहनताफ्याचा मार्ग नो पार्किंग झोन घोषित केला आहे. गांधी मैदानकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील वाहतूकही पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.

Crime Branch LIVE : मुंबईवरून पार्सलने नगपूरला आणलेले 1 कोटी 64 लाखांचे दागिने जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

नागपूर : मुंबईवरून पार्सलने नागपूरला आणलेले 1 कोटी 64 लाखाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मुंबईवरून पांडुरंग पाटील नावाच्या व्यक्तीने सोन्याचे दागिने असलेले पार्सल नागपूरला विमाने पर्सल सेवेतून पाठवले. शेख सलीम शेख वजीर आणि कुणाला राऊत यांनी हे पार्सल घेतले. याची माहिती गुन्हे शाखेला कळताच त्यांनी कुरियर काम करत असलेल्या दोघांना ताब्यात घेतलेय.

Rahul Gandhi LIVE : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना राहुल गांधी यांनी फोन केला आहे. राहुल गांधी यांनी आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस केली. प्रकाश आंबेडकर यांच्यावर काही दिवसांपूर्वीच पुण्यात अँजीओपलास्टीची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ते पुन्हा प्रचारात सक्रिय झाले आहेत.

Baba Siddiqui Murder Case : मुन्नावर फारुखी, आफ्ताब पूनावाला होता गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टवर

हास्यकलाकार मुन्नावर फारुखी आणि श्रध्दा वालकरचा हत्यारा आफ्ताब पूनावाला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टवर होता. बाबा सिद्दिकी यांचा शूटर शिवकुमार गौतम ऊर्फ शिवाच्या चौकशीत खुलासा झाला. लॉरेन्स बिश्नोईचा हस्तक आणि बाबा सिद्दिकी हत्येचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकरच होता. शुभम लोणकर अद्याप फरार आहे.

Ravindra Waikar LIVE : खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा; वायकरांविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद

खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद झाले आहे. गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याप्रकरणी खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगरदंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला आहे.

Priyanka Gandhi Sabha LIVE : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची आज (ता. १६) गांधी मैदान येथे ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ जाहीर सभा होत आहे. सभेसाठी त्या दुपारी अडीच वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहेत. काँग्रेससह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते सभा यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेत आहेत. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. प्रियांका गांधी प्रथमच जाहीर सभेसाठी कोल्हापुरात येत आहेत.

दौरा असा

दुपारी २.२० - कोल्हापूर विमानतळावर आगमन
दुपारी ४ पर्यंत - गांधी मैदान येथील सभेला उपस्थिती
सायंकाळी ४.३० वाजता - कोल्हापुरातून दिल्लीला विमानाने रवाना

Actor Darshan LIVE : अभिनेता दर्शनच्या जामिनाला 'सर्वोच्च’मध्ये आव्हान देणार

Latest Marathi Live Updates 16 November 2024 : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची आज (ता. १६) कोल्हापुरातील गांधी मैदान येथे ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ जाहीर सभा होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये सत्तर वर्षांनंतर येत्या २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होऊ घातलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली सवलतीच्या दरात विशेष रेल्वे देण्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यालयाने नकार दिलाय. तसेच मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, तसेच पणन विभागाला दिल्याचे समजते. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणातील (मुडा) घोटाळ्याचा सूत्रधार बी. के. कुमार याला म्हैसूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला आहे. चित्रदुर्गातील रेणुकास्वामी खून प्रकरणात उच्च न्यायालयाने अभिनेता दर्शनला दिलेल्या अंतरिम जामीन आदेशाला आव्हान देणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे शहर पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी शुक्रवारी सांगितले. त्याचबरोबर राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.