Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 LIVE updates : अदानींच्या बैठकीत महाराष्ट्रातील आमदार खरेदीचा प्लॅन - राहुल गांधी
Sarkarnama November 16, 2024 08:45 PM
Rahul Gandhi Live News : पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झाला आहे, राहुल गांधींची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरावतीमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मोदी-शहांनी महाराष्ट्रातलं सरकार चोरलं आणि अदानींच्या बैठकीत आमदार खरेदीचा प्लॅन केल्याचा आरोप केला. तसंच पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राहुल गांधी म्हणाले, "धारावीच्या जमिनीचा सौदा झाल्यामुळेच आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन विकत घेतलं. आमदार कुणाच्या सांगण्यावरुन खरेदी केले ते सर्वांना माहिती आहे. धारावी अदानींच्या हातात देण्यासाठी सरकार चोरलं."

Balasaheb Thorat Live News : महायुतीने मुख्यमंत्रिपदाच्या नव्हे विरोधी पक्षनेत्याचा चेहरा कोण? यावर चर्चा करावी - बाळासाहेब थोरात

महायुतीकडे बोलण्यासारख काही नाही त्यामुळे ते धर्मावर, जातीवर बोलत आहेत. आम्हाला आधी महायुतीचं सरकार घालवायचं आहे. मुख्यमंत्री कोण हे नंतर ठरवू मात्र, महायुतीने आता मुख्यमंत्रिपदाचा नव्हे तर विरोधी पक्षनेत्याचा चेहरा कोण यावर चर्चा करावी, असा टोला काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला लगावला आहे.

Ashish Shelar Live News : राऊत आणि त्यांचा पक्ष निद्रावस्थेत - आशिष शेलार

संजय राऊत आणि त्यांचा पक्ष (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) निद्रावस्थेत आहे. खऱ्या अर्थाने जे अंबानींच्या लग्नात नाचले त्यांचा नाचा करायला हवा होता का? असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis : 'मविआ'चा जातीवाद करून विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न - फडणवीस

महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच काँग्रेस जाती-जातींमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करत असून केवळ जातीवाद करून विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Former President Pratibhatai Patil News : भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्यातील निवासस्थानी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रतिभाताई पाटील यांचं वय 89 असून, निवडणूक आयोगाच्या होम वोटिंग उपक्रमानुसार त्यांनी घरूनच मतदानाचा हक्क बजावला.

Rahul Kanal On Owaisi : राहुल कनाल यांची ओवैसी बंधूंविरोधात तक्रार

राहुल कनाल यांची ओवैसी भावांविरोधात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. ओवैसी बंधुंनी भाषणादरम्यान केलेली वक्तव्य ही हिंसाचार करण्यास प्रवृत्त करणारी आणि शांतता भंग करणारी व विशिष्ट समाजाची भावना दुखावणारी असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

Jhansi Medical College Live News : झांशीतील रुग्णालयात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील झांशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 LIVE : 'या' दिवसांपासून प्रचाराच्या तोफा थंडावरणार!

कोल्हापुरातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी (ता.18) सायंकाळी सहापासून बंद होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश लागू केले आहेत. प्रचारास बंदी घातल्यानंतर प्रचार करता येणार नाही किंवा सभा घेता येणार नाहीत.

Ravindra Waikar Live News : रवींद्र वायकरांची फाईल अखेर बंद

लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटामधून शिवसेनेत दाखल झालेले रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आलेली आहे. वायकर हे लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर प्रश्चिम मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Priyanka Gandhi Live News : प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात जाहीर सभा

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची आज कोल्हापुरातील गांधी मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.