शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा November 16, 2024 11:44 PM

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज नाशिकमध्ये जाहीर सभा होत असून शुक्रवारी भिवंडी येथे तब्येत बरी नसल्याने सभा न घेताच ते परत फिरले होते. त्यानंतर, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक पश्चिम विधानसभेचे उमेदवार दिनकर धर्मा पाटील यांच्या प्रचारार्थ सातपूर येथे राज ठाकरेंची जाहीर सभा झाली. येथील सभेतून राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. रस्त्याने जाताना ट्राफिक जाम, फुटपाथ नाही, पण याकडे तुमचे लक्ष जाऊ नये म्हणून या सर्व राजकारण लोकांनी उपाय शोधला आहे. आमच्या महाराष्ट्र मधील अनेक लोकांनी भुरळ पडली आहे, ती म्हणजे जाती जातीत द्वेष सुरू झाला आहे. शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यानंतर जाती जातीत द्वेष निर्माण केला. कारण, यांना फक्त मत पाहिजे, तुमचे डोके फुटले तरी चालतील आता मराठा आणि ओबीसी वाद सुरू झाल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भुजबळांवर निशाणा साधला. या भुजबळच्या नदी लागू नका, माळी, मराठा ब्राह्मण हे सर्व मला प्रिय आहेत, असेही राज ठाकरेंनी म्हटलं. 

राजकारण्यांनी महापुरुषांची वाटणी जाती जातीत केली. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे केवळ ब्राह्मणांसाठी बोलले होते का, देशाच्या स्वतंत्र्यासाठी बोलेल होतं. महात्मा फुले केवळ माळी समाजासाठी मुलींना शिक्षण देत होते का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये हे घाण राजकारण आणले, तुम्ही याला बळी पडू नका. मराठवाड्यात एका घरात मृत्यू झाला तेव्हा घरात 3 लोक होते, तिरडीला खांदा द्यायला कोणी नव्हते. नंतर त्याचे नातेवाईक आले आणि मग तिरडीला खांदा दिला. कारण, बाहेर वेगळ्या जातींचे लोक होते म्हणून खांदा देत नव्हते. मूलभूत समस्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून जातीयवाद केला जातोय. हे काय राजकारण होतेय ते ओळखा यासाठी माणसे उभे केले जातात, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं. 

नाशिकचे रस्ते केले, नाशिकचा पाणी प्रश्न सोडवला, 50/60 वर्षे पाण्याची गरज भासणार नाही. बोटनिकल गार्डन केले, रतन टाटा याना आणले, रतन टाटा एवढी मोठी व्यक्ती आहेत कोणी? अशा उद्योगपतीकडे जात नाही, कारण सीएसआर फंडातून काम केले तर पैसे खाता येत नाही. यासर्व उद्योगपतीचे राजकारणी लोकांशी सबंध आहेत, शरद पवारांचे जास्त संबंध आहेत, शरद पवारांना गरिबांची नाव आणि उद्योगपतींची कामं लक्षात राहतात, अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. 

मी मुख्यमंत्र्‍यांच्या खुर्चीसाठी हपालेला

मला कामाची आवड आहे, मी मुख्यमंत्रीच्या खुर्चीसाठी हपापलेला नाही. आपल्याकडे शोधच लागत नाहीत, कारण मूलभूत समस्याच आपल्याला सोडवता आल्या नाहीत, त्या प्रकारची शांतता पाहिजे नुसता गोंगाट असतो. आपल्याकडे गिनीज बुक रेकॉर्डमध्ये ज्यांचे नखं वाढले, मिशा वाढल्या यांची नाव आहेत, याला काय अक्कल लागते का, असा मिश्कील सवालही राज यांनी विचारला. मतदान करताना लक्षात ठेवा, यांनी राजकारण खराब केले त्यांना मतदान करू नका, असे म्हणत राज ठाकरेंनी मनसेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं.  

निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.