सॅन्डविच, बर्गर आणि फ्रॅंकीसारख्या पदार्थामध्ये सर्रासपणे मेयोनीजचा वापर केला जातो. मेयोनीज तर लहान मुलांचा सर्वात आवडता पदार्थ आहे. त्यामुळे अनेक आयादेखील मुलांनी टिफीन खावा, यासाठी पोळीला मेयोनीज लावून देतात, जेणेकरून मुले पोळी खातील. पण, तुम्हाला हे माहित आहे का, मेयोनीज आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. नुकतंच करण्यात आलेल्या या संशोधनातून मेयोनीजचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक असते. मेयोनीजच्या अतीसेवनाने शरीरावर विपरीत परिणाम होऊन अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
मेयोनीज एक पांढरा सॉस आहे. यात अंडी, तेल, व्हिनेगर, मीठ आणि साखर यांचा वापर केला जातो. यांनतर यात मसाला मिक्स केला जातो. मेयोनीजमध्ये पांढऱ्या साखरेचा वापर केला जातो, ज्याला हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपचा एक प्रकार म्हणून देखील ओळखले जाते.
मेयोनीजचे जास्तीचे सेवन वजन वाढीला कारणीभूत ठरते. मेयोनीजमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असतात. ज्यामुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. याशिवाय मेयोनीज तयार करण्यासाठी तेलाचा वापर जास्त केला जातो. जास्तीचे तेल वजन वाढण्याचे कारण ठरते. त्यामुळे तुमचे वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रमाणात मेयोनीज खायला हवेत.
मेयोनीजचे जास्तीचे सेवन रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढली की, डायबिटीजला आमंत्रण मिळते. त्यामुळे डायबिटीजला दूर ठेवण्यासाठी मेयोनीज कमी प्रमाणातच खावे.
मेयोनीजमध्ये कोलेस्ट्रोल आणि कॅलरी जास्त प्रमाणात असतात, जे हाडे ठिसूस करतात. त्यामुळे मेयोनीज खाणे टाळायला हवे.
मेयोनीजमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. शरीरात फॅट्स वाढल्यावर
हृदयाचे आरोग्य धोक्यात येते, हृदयाचे आजारांचा धोका वाढतो.
मेयोनीजमध्ये ओमेगा – 3 फॅटी अॅसिड जास्त प्रमाणात असते, जे शरीरासाठी हानिकारक असते. याच्या सेवनाने ब्लड प्रेशरचा धोका निर्माण होतो. वाढत्या ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे हार्ट अॅटॅकची समस्या निर्माण होते.
हेही पाहा –
संपादन – चैताली शिंदे