पुणे: पुण्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ (Shirur Assembly constituency) भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस एक असताना विद्यमान आमदार अशोक पवार यांनी दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे यांचा पराभव करत हा विधानसभा संघ मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना ही जागा मिळाली. अजित पवारांनी माऊली कटके यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली होती.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अशोक पवार यांनी दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे यांचा पराभव करत हा मतदारसंघ मिळवला होता.
दिवंगत आमदार बाबुराव पाचरणे यांच्या निधनानंतर भाजप पक्षामध्ये कोणताही तगडा नेता या मतदारसंघात पुढे आला नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली पक्षातील अनेक नेत्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं तर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यामुळे या मतदारसंघामध्ये अशोक पवारांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान महायुतीपुढे होतं. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हेच शिरूर विधानसभेतून अशोक पवारांना टफ फाईट देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, अजित पवार बारामतीतून लढणार असल्याचं ठरलं. शिरूर विधानसभेसाठी अजित पवारांनी माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर केली.
शिरूर विधानसभा मतदारसंघावर विविध राजकीय पक्षांचा प्रभाव राहिला आहे. 2014 मोदी लाटेत भाजपाने या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली. परंतु 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. 2019 मध्ये अशोक पवारांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये अशोक पवारांना 145131 इतकी मतं मिळाली होती. तर बाबूराव पाचरणे यांना 103627 इतकी मतं मिळाली होती.