मुंबई : उद्या (17 नोव्हेंबर) हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रभरातून शिवसैनिक या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी येत असतात. जर प्रशासनाला या सभेसाठी परवानगी द्यायची नसेल तर येणाऱ्या शिवसैनिकाला अडवले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला होता. तसेच त्यावेळी प्रशासनाने ठरवावे काय करायच. मात्र 17 तारखेला शिवतीर्थावर सांगता सभा होणारच असा विश्वास राऊतांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. त्यानंतर आमची सांगता सभा शिवतीर्थावर नाही तर बीकेसीवर होणार, अशी माहिती आज खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे. (Sanjay Raut On 17 november shivtirth sabha.)
हेही वाचा : Maharashtra Assembly 2024 : निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात; राजकीय आरोप – प्रत्यारोपांना धार
– Advertisement –
तसेच मनसेला देखील शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास परवानगी नसल्याचे यावेळी राऊतांनी सांगितले आहे. तसेच शिवाजी पार्कचा मुद्दा आमच्यासाठी गंभीर नसल्याचं ते बोलले आहेत. त्यामुळे आमची सांगता सभा ही बीकेसीमध्ये होणार असल्याचे संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले आहे.
हेही वाचा : Maharashtra Election 2024 : हिंदू-मुस्लिम मुद्द्याला उठता-बसता ‘फोडणी’… ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा
– Advertisement –
दोन दिवसापूर्वी शिवतीर्थावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका, असा इशारा राऊतांनी दिला आहे. ते म्हणाले होते, 17 नोव्हेंबर हा दिवस पूर्वीपासून शिवसेनेसाठी बूक असतो. कारण शिवतीर्थावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक येतात. मात्र जर सरकारने या शिवसैनिकांना अडवले, तर नक्कीच गोंधळ निर्माण होईल असे ते म्हणाले आहेत. तसेच सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. प्रत्येक पक्षांकडून आपल्या वरिष्ठ नेत्यांना महाराष्ट्रात बोलवून प्रचार सभा घेतल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच मनसेला आणि उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. वर्षातून 45 दिवस शिवाजी पार्कचे मैदान विविध कार्यक्रम आणि सभांसाठी आरक्षित असते. मात्र हा कालावधी आता संपल्यामुळे या दोन्ही पक्षांना सभेसाठी मैदान मिळणार नसल्याचे समोर आले आहे. त्याच अगोदर सर्वात आधी अर्ज केलेल्या भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेला मात्र मैदान मिळाले आहे. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाची सांगता सभा ही शिवतीर्थावर होणार नसून ती बीकेसीमध्ये पार पडणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी माध्यमांंना दिली आहे.
Edited By Komal Pawar Govalkar