Chalisgaon Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Assembly Election 2024) संपूर्ण राज्यात एकाच वेळी मतदान होणार आहे. यंदा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अतिशय रंजक असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात रंगत दिसून येत असून, जनता कोणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे आता जनतेचं लक्ष लागलंय. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची (Chalisgaon Vidhan Sabha Constituency) राज्यात सर्वाधिक चर्चा आहे. महाराष्ट्रातील चाळीसगाव विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 17 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून मंगेश चव्हाण आणि उन्मेष पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. यंदा या निवडणूकीची रंजक झलक पाहायला मिळणार आहे
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केल्याचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. आता चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांच्यात थेट लढत होणार आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ ही भाजपसाठी महत्त्वाची जागा असून त्यामागील कारण म्हणजे या जागेवर 1990 पासून फक्त एकच निवडणूक सोडली तर सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. 2009 मध्ये या जागेवर राष्ट्रवादीचे राजीव देशमुख विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये भाजपने ही जागा परत घेतली, त्यानंतर 2019 मध्येही भाजपचे मंगेश रमेश चव्हाण येथून आमदार झाले.
2019 निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर मंगेश रमेश चव्हाण यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर राष्ट्रवादीने देशमुख राजीव अनिल यांना संधी दिली होती. या निवडणुकीच्या निकालाबाबत बोलायचे झाले तर भाजपचे मंगेश रमेश चव्हाण यांना 86515 तर देशमुख राजीव अनिल यांना 82228 मते मिळाली. दोघांमधील अटीतटीच्या लढतीत भाजपचे मंगेश चव्हाण विजयी झाले होते. त्यामुळे यंदा 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अतिशय रंजक असणार आहे. यंदा जुन्या पक्षांना नवे नेतृत्व मिळाले तर काहींनी जुन्याच नेतृत्वाने नव्या पक्षांची सूत्रे हाती घेतली आहेत. अशा स्थितीत जनता जुन्या पक्षांच्या आघाडीला साथ देणार की जुन्या नेतृत्वाला हे पाहायचे आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागा जिंकण्यासाठी 145 जागांचे बहुमत आवश्यक आहे. चोपडा (Chalisgaon) विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 17 व्या क्रमांकावर आहे.