विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) वाहतूक महामार्ग पोलीस परजिल्ह्यात ड्यूटीवर गेल्याने भुईंज महामार्ग पोलिसांचा (Bhuinj Highway Police) ताफा अत्यल्प आहे.
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) (Khambatki Ghat) सकाळी सात वाजल्यापासून जाम झाला आहे. घाटातील दत्त मंदिराजवळ 50 टन माल घेऊन जाणारा कंटेनर बंद पडल्याने ही वाहतूक खोळंबलीये. सध्या खंडाळ्यातील जुन्या टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
तर, काही वाहने बोगद्यामार्गे विरुद्ध दिशेने जाऊ लागल्याने ही वाहतूक कोंडी अधिक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) वाहतूक महामार्ग पोलीस परजिल्ह्यात ड्यूटीवर गेल्याने भुईंज महामार्ग पोलिसांचा (Bhuinj Highway Police) ताफा अत्यल्प आहे.
यामुळे पोलीस उपनिरीक्षक (वाहतूक महामार्ग पोलीस) गोरड व त्यांचे सहकारी सकाळपासून वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त आहेत. आठवडा सुट्टी असल्याने आणि निवडणूक प्रचारामुळे मार्गावर वाहनांची गर्दी आहे. दरम्यान, खासगी क्रेनला बोलावून हे कंटेनर बाजूला करावे लागणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने अद्यापही क्रेन न दिल्याने हा नेहमीचा खोळंबा होत आहे.