गडचिरोलीमध्ये मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भामरागडच्या पर्लकोटा नदीवर पुलाच्या बांधकामाजवळ बॉम्बस्फोट करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे भामरागडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटाप्रकरणी सध्या तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील भामरागड येथे आज सकाळी १० वाजताच्या दरम्यान मोठी दर्घटना घडली. भामरागड येथे निवडणुकीच्या पार्शवभूमीवर नेहमीप्रमाणे पोलिस आपल्या गस्तीवर होते. काही पोलिस पर्लकोटा नदीच्या पलीकडील भागात होते आणि पर्लकोटा नदी पुलाचे काम सुरु असल्याने पुलावर काम करणारे कर्मचारीही कामावर होते.
अचानकपणे एका ठिकाणी संशयस्पद चुण्याचे मार्किंग दिसल्याने पुलावरील कर्मचारी यांना बोलावून ते मार्किंग आपण केले का असे विचारले? असता आम्ही या ठिकाणी मार्किंग केलेली नाही अशाप्रकारची उत्तर त्यांनी दिली.
पुलाजवळचे मार्किंग कामगारांनी केले नसल्याचे कळताच पोलिसांचा संशय अधिक वाढला आणि त्यांनी आपल्या तपासणीला परत गती दिली. तितक्यातच अगदी पुलाजवळ त्याच ठिकाणी स्फोट झाला. मात्र यात कोणत्याही प्रकारे मालाची नुकसान झाली नाही. तसेच परत बॉम्ब असण्याची शक्यता विभागाकडून वर्तविली जात आहे.
त्यामुळे भामरागड आणि अल्लापल्ली मार्गांवरील सर्व वाहन थांबवून बॉम्ब शोधक पथकाद्वारे तपासणी सुरु आहे. दरम्यान, हा स्फोट नक्षलवाद्यांनी केलेला नाही अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बॉम्बशोधक पथकाने स्वतः हा बॉम्ब निष्क्रिय केला. अजूनही दुसरा बॉम्बची असण्याची शक्यता आहे त्यामुळे शोध मोहीम सुरू आहे.