कलिना विधानसभा मतदारसंघात काँटे की टक्कर, संजय पोतनीस की अमरजित सिंह, कोण बाजी मारणार?
जयदीप मेढे November 17, 2024 12:13 AM

Kalina Vidhan Sabha constituency: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कलिना मतदारसंघातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय पोतनीस (Sanjay Potnis) कलिना मतदारसंघातू निसटत्या फरकाने विजयी झाले आहेत. 2009 मध्ये कलिना विधानसभेत (Kalina Vidhan Sabha) काँग्रेसचे कृपाशंकर सिंह आमदार झाले होते. काँग्रेस सत्तेत असताना या मतदारसंघावर कृपाशंकर सिंह यांची भक्कम पकड होती. मात्र, 2014 मध्ये या मतदारसंघातील परिस्थिती बदलली होती.  2014 साली कलिना मतदारसंघातून संजय पोतनीस अवघ्या 1,297 मतांनी तर 2019 मध्ये 4,931 मतांनी निवडून आले होते. यंदा संजय पोतनीस (Sanjay Potnis) यांच्यासमोर भाजपच्या अमरजितसिंह आणि मनसेच्या संदीप हुटगी यांचे आव्हान आहे. 

शिवसेना पक्षात फूट पडल्यामुळे यंदाची निवडणूक संजय पोतनीस यांच्यासाठी अवघड ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मनसेचा उमेदवार किती मते घेणार, यावरही निकाल अवलंबून आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये संजय पोतनीस अत्यंत कमी फरकाने निवडून आल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबरला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.