घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात 'श्रीमंत' पराग शहा पुन्हा जिंकणार की राखी जाधव चमत्कार करणार?
जयदीप मेढे November 17, 2024 12:13 AM

Ghatkoper East Vidhan Sabha constituency: राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या पराग शाह यांच्या घाटकोपर पूर्व मतदारसंघात यंदाची लढत चुरशीची ठरु शकते, अशी चर्चा आहे. या मतदारसंघातून सुरुवातीला भाजपचे प्रकाश मेहता (Prakash Mehta) हेदेखील इच्छूक होते. मात्र, भाजप नेतृत्त्वाने पुन्हा एकदा पराग शाह (Parag Shah) यांनाच संधी दिली होती. त्यामुळे प्रकाश मेहता नाराज झाले होते. अंतिम टप्प्यात त्यांची समजूत काढण्यात यश आले असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत प्रकाश मेहता यांच्या नाराजीचे पडसाद मतपेटीत उमटणार का, हे पाहावे लागेल. या मतदारसंघात शरद पवार गटाकडून राखी जाधव आणि मनसेकडून संदीप कुलथे रिंगणात आहेत. 

घाटकोपर पूर्व मतदारसंघावर (Ghatkoper East Vidhansabha) गेल्या काही वर्षांपासून भाजपने वरचष्मा राखला आहे. 2009 आणि 2014 मध्ये घाटकोपर पूर्व मतदारसंघातून प्रकाश मेहता निवडून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये भाजपने पराग शाह यांना रिंगणात उतरवले होते. त्यांनी या मतदारसंघात सहज विजय मिळवला होता. हा मतदारसंघ गुजरातीबहुल लोकसंख्येचा आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला पराग शाह यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राखी जाधव आणि संदीप कुलथे काही राजकीय चमत्कार करु शकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.