महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकी दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस दिली आहे. तक्रारीबाबत उत्तर देण्याच्या दोघांना आयोगाने सूचना केली आहे. विरोधातील तक्रारींच्या प्रती दोन्ही पक्षांना अध्यक्षांना आयोगाने पाठवल्या आहेत.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी कोल्हापुरात दाखलविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांची कोल्हापुरात सभा.गांधी मैदान येथे होणार प्रियांका गांधी यांची सभा. या सभेसाठी प्रियंका या कोल्हापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रियांका गांधी यांचे विमानतळावर स्वागत केले.
Manoj Jarange Patil Live News : मराठा आरक्षणाला विरोध करणार्यांना पाडा - जरांगे पाटीलमराठा आरक्षणाला विरोध करणार्यांना पाडा, असं आवाहान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यात केलं आहे. मनोज जरांगे पाटील आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी हे आवाहन मराठा समाजाला केलं आहे. शिवाय मी कोणाचे नाव घेणार नाही. मात्र ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा, असं सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.
Priyanka Gandhi's speech at Shirdi Live : राहुल गांधींना मोदी घाबरू लागलेत - प्रियांका गांधीकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शिर्डीतील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातून स्वातंत्र्याची लढाई मजबूत झाली. इथल्या मातीतील संतानी मानवतेचा संदेश आणि सत्याची शिकवण दिली. मात्र मोदीजींच्या राज्यात सत्याची बाजू कुठे राहिली आहे? असा सवाल करत त्यांच्या सरकारमधील मंत्री आणि आमदार काहीही बोलायला लागले असून ते महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. संसदेबाहेरील शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवली, सिंधुदुर्गातील पुतळा पडला, असं म्हणत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. तर यावेळी त्या म्हणाल्या, मी मोदींना आव्हान देते की, 'त्यांनी एकदा जातीय जनगणना करणार असल्याचं जाहीर करावं.' तर राहुल गांधींना मोदी घाबरू लागले आहेत म्हणून ते त्यांच्यावर टीका करत आहेत, असंही ते या सभेत म्हणाल्या.
Prakash Ambedkar Live News : प्रकाश आंबेडकरांची प्रकृती बिघडलीवंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे आंबेडकर यांचा धुळे दौरा रद्द करण्यात आला आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली आहे याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिलं आहे.
Manoj Jarange Patil Live News : मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावरमराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज छगन भुजबळांच्या बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या येवला मतदारसंघाचा दौऱ्यावर आहेत. ऐन विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जरांगे पाटील हे भुजबळांच्या मतदारसंघातील अनेक गावांना सांत्वनपर भेट देणार आहेक. तर दुसरीकडे छगन भुजबळ हे देखील आज येवल्यात प्रचार सभा घेणार आहेत.
Muralidhar Mohol Live News : मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगांची तपासणीकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. सोलापुरात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. मुरलीधर मोहोळ हे महायुतीच्या प्रचारार्थ सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलापूर विमानातळावर ते आले असता त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.
Rahul Gandhi Live News : पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झाला आहे, राहुल गांधींची टीकाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरावतीमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मोदी-शहांनी महाराष्ट्रातलं सरकार चोरलं आणि अदानींच्या बैठकीत आमदार खरेदीचा प्लॅन केल्याचा आरोप केला. तसंच पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राहुल गांधी म्हणाले, "धारावीच्या जमिनीचा सौदा झाल्यामुळेच आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन विकत घेतलं. आमदार कुणाच्या सांगण्यावरुन खरेदी केले ते सर्वांना माहिती आहे. धारावी अदानींच्या हातात देण्यासाठी सरकार चोरलं."
Balasaheb Thorat Live News : महायुतीने मुख्यमंत्रिपदाच्या नव्हे विरोधी पक्षनेत्याचा चेहरा कोण? यावर चर्चा करावी - बाळासाहेब थोरातमहायुतीकडे बोलण्यासारख काही नाही त्यामुळे ते धर्मावर, जातीवर बोलत आहेत. आम्हाला आधी महायुतीचं सरकार घालवायचं आहे. मुख्यमंत्री कोण हे नंतर ठरवू मात्र, महायुतीने आता मुख्यमंत्रिपदाचा नव्हे तर विरोधी पक्षनेत्याचा चेहरा कोण यावर चर्चा करावी, असा टोला काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला लगावला आहे.
Ashish Shelar Live News : राऊत आणि त्यांचा पक्ष निद्रावस्थेत - आशिष शेलारसंजय राऊत आणि त्यांचा पक्ष (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) निद्रावस्थेत आहे. खऱ्या अर्थाने जे अंबानींच्या लग्नात नाचले त्यांचा नाचा करायला हवा होता का? असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
Devendra Fadnavis : 'मविआ'चा जातीवाद करून विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न - फडणवीसमहाविकास आघाडीकडून व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच काँग्रेस जाती-जातींमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करत असून केवळ जातीवाद करून विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Former President Pratibhatai Patil News : भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्कभारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्यातील निवासस्थानी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रतिभाताई पाटील यांचं वय 89 असून, निवडणूक आयोगाच्या होम वोटिंग उपक्रमानुसार त्यांनी घरूनच मतदानाचा हक्क बजावला.
Rahul Kanal On Owaisi : राहुल कनाल यांची ओवैसी बंधूंविरोधात तक्रारराहुल कनाल यांची ओवैसी भावांविरोधात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. ओवैसी बंधुंनी भाषणादरम्यान केलेली वक्तव्य ही हिंसाचार करण्यास प्रवृत्त करणारी आणि शांतता भंग करणारी व विशिष्ट समाजाची भावना दुखावणारी असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
Jhansi Medical College Live News : झांशीतील रुग्णालयात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यूउत्तर प्रदेशातील झांशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE : 'या' दिवसांपासून प्रचाराच्या तोफा थंडावरणार!कोल्हापुरातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी (ता.18) सायंकाळी सहापासून बंद होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश लागू केले आहेत. प्रचारास बंदी घातल्यानंतर प्रचार करता येणार नाही किंवा सभा घेता येणार नाहीत.
Ravindra Waikar Live News : रवींद्र वायकरांची फाईल अखेर बंदलोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटामधून शिवसेनेत दाखल झालेले रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आलेली आहे. वायकर हे लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर प्रश्चिम मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
Priyanka Gandhi Live News : प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात जाहीर सभामहाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची आज कोल्हापुरातील गांधी मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.