मुंबई काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी अनेक आकर्षक वचनं दिली असून, त्या संदर्भात विविध टीकाही होऊ लागली आहे. काँग्रेसच्या या जाहीरनाम्याच्या प्रमुख मुद्दयांमध्ये महिलांसाठी भरीव वचनं, बेरोजगारीविरोधी उपाय, आणि मच्छीमार समाजाच्या कल्याणासाठी असंख्य योजना समाविष्ट आहेत. परंतु, जाहीरनाम्यात बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आल्याने काँग्रेसवर टीका होत आहे. विशेषतः सोनिया गांधी यांचा फोटो जाहीरनाम्यात का नाही असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
पी. चिदंबरम काय म्हणाले?काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य अजूनही देशातील एक प्रमुख आर्थिक केंद्र आहे, परंतु या स्थितीत मोठ्या प्रमाणावर घसरण होत असल्याचा इशारा त्यांनी दिला.
चिदंबरम यांनी सांगितले की, "महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य होते, इंडस्ट्री, सेवा क्षेत्र आणि शेती क्षेत्रात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र, आता शेती क्षेत्र अत्यंत बिकट स्थितीत आहे. शेती मालाचे दर घसरले आहेत आणि आर्थिक तूट मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याच वेळी, सेवा क्षेत्रातदेखील घसरण दिसून आली आहे."
चिदंबरम यांनी सरकारच्या कर्ज घेण्याच्या धोरणावरही टीका केली आणि राज्य सरकारला प्रश्न विचारला, "पैसे वापरले जात आहेत, पण विकास होतो का?" बेरोजगारीच्या वाढत्या समस्येवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. "18300 पोलीस भरतीसाठी 11 लाख उमेदवारांनी अर्ज केला आहे, तर तलाठी भरतीसाठी 4600 जागांसाठी 11.5 लाख उमेदवार आहेत. राज्यातील बेरोजगारीची स्थिती अत्यंत गंभीर आहे," असं त्यांनी सांगितलं.
चिदंबरम यांनी सरकारच्या कर्ज घेण्याच्या धोरणावरही टीका केली आणि राज्य सरकारला प्रश्न विचारला, "पैसे वापरले जात आहेत, पण विकास होतो का?" बेरोजगारीच्या वाढत्या समस्येवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. "18300 पोलीस भरतीसाठी 11 लाख उमेदवारांनी अर्ज केला आहे, तर तलाठी भरतीसाठी 4600 जागांसाठी 11.5 लाख उमेदवार आहेत. राज्यातील बेरोजगारीची स्थिती अत्यंत गंभीर आहे," असं त्यांनी सांगितलं.
वर्षा गायकवाडांनी जाहीर केला काँग्रेसचा 'मुंबईनामा'वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने मुंबईकरांसाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे. "मुंबईचा मुंबईनामा आम्ही देत आहोत," असं त्यांनी सांगितलं. या योजनांमध्ये महिलांसाठी ३००० रुपये मासिक सहाय्य, महिलांसाठी वन स्टॉप क्रायसिस सेंटर, वसतीगृहांची उभारणी, आणि बेरोजगार तरुणांसाठी महिना ४००० रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे.
तसेच, गायकवाड यांनी मच्छीमार समुदायासाठी ५ लाख रुपयांची कर्जमाफी, २५ लाख रुपये आरोग्य विमा, आणि मोफत औषधं देण्याचा प्रस्ताव मांडला. एक वर्षाच्या शिकाऊ उमेदवारीसाठी शिक्षित तरुणांना संधी देणं, धारावी प्रकल्प रद्द करणं, आणि आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवरून हटवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.