Narayan Rane : सिंगापूर, मलेशिया यासारखं पर्यटन असलेल्या देशासारखं पर्यटन आपल्याला सिंधुदुर्गात करायचं असल्याचे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं. केंद्राच्या माध्यमातून दोडामार्गमध्ये हॉस्पिटलमध्ये लागणारे मशीन बनवणारे कारखाने आणणार असल्याचेही राणे म्हणाले. यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) देखीलव जोरदार टीका केली. इथे का येतो कळत नाही, उद्धव ठाकरे इथं येऊन बोलतो राणेंना गाडणार, समोर येऊन दाखव म्हणावं असा टोला देखील राणेंनी लगावला. सावंतवाडीत गांधी चौकात जाहीर महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजीत केली आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
दीपक केसरकर तीन वेळा निवडून आले, त्यांच्या विरोधात कपडे नसलेले उमेदवार रिंगणात असल्याची टीका देखील नारायण राणे यांनी राजन तेली यांच्यावर केली. बंडखोर उमेदवार विशाल परब याच्याकडे काही व्यवसाय नसून पैसे कुठून वाटतात? काय त्याची गुणवता. ग्रामपंचायतमध्ये केव्हा निवडून आला नाही असेही राणे म्हणाले. राजन तेली यांना आम्ही प्रयत्न करून आमदार केलं, पण त्यांनाप्रभावी भाषण करता येत नाही, कुणाला मदत केली नाही, त्याच कार्य काय. राणेंच्या बाजूचा कोणी गेला की त्याचा भाव वाढतो. लोकांचं शोषण करणारा उमेदवार निवडून आणू नका असे राणे म्हणाले. दीपक केसरकर यांच्या विरोधात कोणीही उमेदवार देतात, त्यांची लायकी काय? असा सवाल करत नारायण राणे यांनी राजन तेली यांच्यावर टीका केली.
या निवडणुकीत चांगली माणसं निवडा, मी दिल्लीत असलो तरी राज्यात आपलं चालतं, त्यामुळे विकास काय असतो तो आम्ही करु असे नारायण राणे म्हणाले. राजन तेली म्हणजे बेरक्या, आमच्या भाजप वाल्यांनी त्याला मोठं केलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणात पूर आला काय दिलं? शिव्या, शाप देण्याचं काम केल्याचे राणे म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना ती आज नाही, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात शिवसेना संपवल्याचे नारायण राणे म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी काय दिलं? असा सवाल देखील नारायण राणे यांनी केला. लाडकी बहीण योजना आली त्यावर ते टीका करत आहेत असेही राणे म्हणाले.