Nana Patole : अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवसेनेला (Shivsena) धोका केला असल्यामुळं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपची (BJP) साथ मागितली असेल असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. सिल्लोड विधानसभेमध्ये अब्दुल सत्तार यांना हरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भाजपची साथ मागितली आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रीया दिली. ते गोंदियामध्ये बोलत होते.
अमित शाह यांनी दलित आणि आदिवासी यांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा डाव राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे करत असल्याच्या आरोप केला होता. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अमित शाह यांना संविधानच माहीत नाही. त्यामुळं काही पण बोलायचं रेटून बोलायचं असे अमित शाह याचं धोरण आहे. संविधानामध्ये अनेक बाबी आहेत. त्यामुळे दलित आणि आदिवासी यांच्या आरक्षण संपवण्याचा डाव भाजपा करत असल्याचे नाना पटोले म्हणाले. भाजप जनगणना का करीत नाही? गेल्या 20 वर्षापासून दलित आदिवासी यांची जनगणना झालीच नाही. त्यांना कुठल्या आधारावर आरक्षण देणार. तुमच्या नीती आयोग त्यांना कोणत्या आधारावर आर्थिक ताकद देणार आहे. त्यामुळं आपणच आरोप करायचा आणि आरक्षण संपवायचं हा अमित शाह याचा धंदा असल्याचा आरोप नाना पटोले यांनी अमित शाह यांच्यावर केला.
कितीही विरोध केला तरी वक्फ बोर्डाचा कायदा बदलणार नाही, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले होते. अमित शाह यांना सत्तेचा माज आला आहे, असे वक्तव्य ते सत्तेच्या माज असल्यामुळं करत आहेत. आज ते सत्तेत आहेत. त्यांनी काय करायचं ते ठरवावे पण केंद्र सरकार हे कुबडीचे सरकार आहे. हे अमित शाह यांनी डोक्यात ठेवलं पाहिजे. ते कसं पुढे न्यायचं त्यांनी ठरवावे असा टोला त्यांनी अमित शाह यांना लगावला.
वोट जिहाद होत असेल तर मताचे धर्मयुद्ध करावा लागेल असे म्हणत फडणवीस यांनी सभेत नोमानी यांच्या व्हिडिओ दाखला होता आणि विरोधकावर हल्लाबोल केला होता. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, फडणवीस यांना माझा प्रश्न आहे की, RSS हे धर्माचे काम करते आणि जेव्हा RSS अशा प्रकारच्या फतवा काढतो तेव्हा फडणवीस विरोध का करीत नाहीत? कोणत्याही धर्म व्यवस्थेने राजकीय हस्तक्षेप करू नये परंतु आरएसएसने ती सुरुवात केली आहे. मग RSS वर टीका केली पाहिजे ना असा प्रश्न नाना पटोले यांनी केला. हारण्याच्या भीतीने मुसलमान आणि हिंदू करणं हा जो भाजपचा अजेंडा आहे हा त्यांनी बंद केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रश्नावर बोलणं सोडून नरेंद्र मोदी, अमित शहा ,योगी आदित्यनाथ हे हिंदू मुसलमान यावर बोलूनच महाराष्ट्राचे विधानसभा लढवण्याच्या निर्णय घेतला असल्याचे पटोले म्हणाले.