सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashtra Assembly Constituency Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार केला जात आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेतून दीपक केसरकर यांनी यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणा केली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
दीपक केसरकर म्हणाले की, देशात चुकीची परंपरा झाली. खोटं बोलून नेरेटीव्ह सेट केला जात आहे. गेल्या 15 वर्षात मी काय काम केलं यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मी गेल्या 5 वर्षात 2500 कोटी रुपयांचा निधी आणला. उद्धव ठाकरे सावंतवाडीत येऊन काय बोलतात, साईबाबांबद्दल बोलतात. मात्र साईबाबांनी आशीर्वाद दिले म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा उद्धव ठाकरे केव्हाच मुख्यमंत्री झाले नसते, अशी त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हाची स्थिती बघा. त्यावेळी किती मताधिक्य होतं ते बघा. नारायण राणे यांनी मला पहिल्यांदा आमदार केलं. विधानपरिषदेत मी आठ वेळा बजेट सादर केलं. जी युती बाळासाहेबांनी निर्माण केली, ती युती सिंधुदुर्गात मोडण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. मी स्वतः बजेट सादर करताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला निधी दिला, मात्र उद्धव ठाकरे आपण निधी दिला असे म्हणतात. निविदा मिळवण्यासाठी बाऊन्सर घेऊन फिरणारे उमेदवार या मतदारसंघात उभे आहेत, त्यांच्यापासून सावध राहा, असेही दीपक केसरकर म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांना मराठीचा अभिमान होता, तर मराठी संवर्धन करायची कार्यालये मुंबईच्या बाहेर का गेली? ती सर्व कार्यालये मी पुन्हा मी मुंबईमध्ये आणली. यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणा यावेळी दीपक केसरकर यांनी केली.
दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी देखील या सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे इथे का येतात कळत नाही, उद्धव ठाकरे येथे येऊन बोलले राणेंना गाडणार, समोर येऊन दाखवा म्हणावं. मातोश्री बाहेर काय ते बोलवायला सांगा. दीपक केसरकर तीन वेळा निवडून आले, त्यांच्या विरोधात कपडे नसलेले उमेदवार रिंगणात आहेत. बंडखोर उमेदवार विशाल परब याच्याकडे काही व्यवसाय नसून पैसे कुठून वाटतात? काय त्याची गुणवता आहे? ग्रामपंचायतीमध्ये कधी निवडून आला नाही, असा हल्लबोल त्यांनी यावेळी केला.
आणखी वाचा
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला