मुंबईहून लग्नासाठी निघालेल्या नवरदेवाची सुटणार होती ट्रेन...; मदतीसाठी रेल्वेला साद घातली आणि असं काही घडलं की...
Times Now Marathi November 16, 2024 11:45 PM

Train: च्या संबंधित एक अतिशय रंजक बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती ने आपल्या लग्नासाठी ट्रेनने निघाला होता. त्याच्यासोबत इतरही नातेवाईक होते. हेसर्वजण मुंबईहून गीतांजली एक्सप्रेसने गुवाहाटीकडे निघाले होते. पण ट्रेन 3 ते 4 तास उशिराने धावत होती. ट्रेन उशिरा धावत असल्याने आपली कनेक्टिंग ट्रेन चुकणार याचा अंदाज नवरदेवाला आला. यानंतर त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने रेल्वेला मदतीसाठी साद घातली.

नेमकं काय घडलं?
नवरदेव आपल्या लग्नासाठी मुंबई ते गुवाहाटी या गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करत होता. त्याच्यासोबत जवळपास कुटुंबातील 35 सदस्य होते. नवरदेवाला कोलकाता येथील हावडा रेल्वे स्टेशनवरुन सराईघाट एक्सप्रेस पकडायची होती. पण गीजांतली एक्सप्रेस तीन ते चार तास उशिराने धावत होती. त्यामुळे आपली कनेक्टेड ट्रेन चुकणार हे नवरदेव आणि त्याच्यासोबत असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले.

यानंतर नवरदेवासोबत असलेल्या चंद्रशेखर बाग यांनी एक्सवर पोस्ट करत परिस्थितीची माहिती रेल्वेमंत्री अशविनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाला कळवली. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा प्रवास करत असल्याचं त्यांनी सांगितले. ट्रेन चुकली तर आपण लग्नासाठी वेळेवर पोहोचू शकणार नाही अशी भीती वाटत असल्याचं त्यांनी सांगत मदत मागितली.

रेल्वे प्रशासनाच्या मदतीसाठी हालचाली
यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या. रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या सूचनेनुसार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि हावडा येथील वरिष्ठ विभागीय व्यवावसायिक व्यवस्थापकांनी सराईघाट एक्सप्रेस हावडा येथे काही काळ थांबवण्याचा निर्णय घेतला. यासोबतच गीतांजली एक्सप्रेसच्या मोटरमनला सुद्धा परिस्थितीची माहिती देण्यात आली आणि गाडीचा वेग थोडा वाढवण्याच्या सूचना दिल्या.

विशेष कॉरिडॉर
यानंतर गीतांजली एक्सप्रेस हावडा रेल्वे स्थानकात पोहोचली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून एक खास कॉरिडॉर तयार कतर लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व 35 जणांना प्लॅटफॉर्म क्रमांक 21 न्यू परिसर येथून प्लॅटफॉर्म क्रमांक 9 ओल्ड कॉम्प्लेक्समध्ये पोहोचवण्यात आले. नवरदेवासोबत वयोवृद्ध नागरिक असल्याने त्यांच्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या चार गाड्या आणि व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती.

रेल्वेचे मानले आभार

रेल्वे स्टेशनवर करण्यात आलेली विशेष व्यवस्था आणि त्यासोबतच ट्रेन मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले पाऊल या सर्वांमुळे नवरदेवाला 12345 सारीघाट एक्सप्रेस पकडण्यात यश मिळाले. परिणामी नवरदेव आपल्या लग्नासाठी वेळेवर वधूच्या घरी पोहोचला. यानंतर चंद्रशेखर यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.