Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार
esakal November 17, 2024 03:45 AM

- धनंजय शेटे

भूम - परंडा मतदारसंघात सर्वच पक्षाकडून प्रचाराला जोर धरला असताना अपक्ष ही यामध्ये काही कमी नाही. असाच एक आगळी वेगळी तक्रार परंडा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

अधिक माहिती अशी की, अपक्ष उमेदवार कांबळे यांची निशाणी 'चप्पल' असून मतदान बूथपासून २०० मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराने चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शित करण्यासाठी आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो व आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये.

म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांना गुरुदास कांबळे यांनी लेखी अर्ज करून त्यांचे निशाणी 'चप्पल' असून त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथपासून २०० मीटर अंतरामध्ये कोणतेही कर्मचारी पदाधिकारी उमेदवार व मतदार यांनी जर 200 मीटरच्या आत 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कांबळे यांनी केले आहे.

कारण 'चप्पल' ही कांबळे यांची निशाणी असल्यामुळे ते पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार लोकांनी पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो. व आचारसंहिता भंग होणार याच्यात शंका नाही. तरी बूथपासून २०० मीटरच्या आत दिनांक 20 नोव्हेंबर रोजी कोणत्याही व्यक्तीला चप्पल घालून प्रवेश न करून देणे, हा आज आदर्श आचारसंहितेचा एक भाग असून, त्या नियमांचे पालन काटेकोरपणे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे २०० मीटर अंतरामध्ये पायाला कुठलीही दुखापत होऊ नये याबाबत सुव्यवस्था करावी, अशी मागणी कांबळे यांनी यावेळी केली आहे.

कांबळे यांनी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी कार्यालयाकडे अर्ज सादर करून आपली निशाणी 'चप्पल' असून त्याचा प्रचार व प्रसार मतदानभूत पासून २०० मीटरच्या आत २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी कोणतेही कर्मचारी पदाधिकारी उमेदवार व मतदार यांनी २०० मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे नमूद केलेले आहे.

परंतु चप्पल ही वस्तू दैनंदिन वापरातील असून याबाबतच्या वापरास कोणासही प्रतिबंध करता येत नाही .याकरिता कार्यालय स्तरावरून आपली १४ नोव्हेंबर रोजी तक्रार निकाली करण्यात येत आहे .

- वैशाली पाटील, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, परंडा मतदारसंघ.

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.