Kiren Rijiju News: लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलणार हा मुद्दा सर्वाधिक प्रभावी ठरला होता. त्याचा चांगलाच फायदा काँग्रेसला झाला होता. आता विधानसभेच्या निवडणुकतही काँग्रेसचा याच मुद्याभोवती प्रचार फिरत असून यास जातीनिहाय जनगणनेची जोड देण्यात आली आहे. मात्र यावेळी भाजपने प्रत्युत्तर देण्याची आधीच तयारी करून ठेवली आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री तसेच अल्पसंख्यक खात्याचे मंत्री किरेन रिजजू यांनी काँग्रेसला संविधान मसुदा समितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा का दिला होता? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसकडे मागितले आहे. काँग्रेसने आरक्षणाला विरोध दर्शवल्यानेच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा यावेळी रिजजू यांनी केला.
काँग्रेसनेच संविधान प्रस्तावनेत बदल करून त्याचे स्वरुप बदलले. संविधानात सर्वाधिक दुरुस्त्या काँग्रेसच्याच काळात झाल्या आहेत. मूळ संविधानात नसतानाही अनेक बाबी त्यात घुसडण्यात आल्याचा आरोपही यावेळी रिजजू यांनी केली.
राहुल गांधी फक्त मतांच्या राजकारणासाठी संविधानप्रेमी असल्याचे नाटक करीत आहे. मुळात काँग्रेस पक्षच आरक्षण विरोधी आहे. अनेक वर्षांपासून राजकारणात असतानाही त्यांना दलित आणि आदिवासी यांच्याबद्दल काही माहिती नाही. ते अपरिपक्व नेता असल्याचेही रिजजू म्हणाले.
सध्या वक्फ बोर्डाचा मुद्दा चांगलाच चर्चा चर्चेत आहे. वक्फ बोर्ड संशोधन विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. भाजपच्या मित्रपक्षांनाची हे विधेयक थेट पटलावर ठेवण्यास विरोध केला होता. असे असले तरी संशोधन विधेयक येत्या हिवाळी अधिवेशात पारित होईल असा दावाही रिरजू यांनी केला. तसेच मुस्लिम समाज आणि महिला संघटनांसोबत चर्चा केली असता या विधेयकाला 80 मुस्लिमांचे समर्थन असल्याचा दावाही रिजजू यांनी केला.