देवरी-आमगावमध्ये पुराम विरुद्ध पुराम, दुहेरी लढतीमध्ये कोण मारणार बाजी?
देवेंद्र रहांगडाले November 17, 2024 04:13 PM

Devri Amgaon Vidhan Sabha constituency:  गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव विधानसभा मतदारसंघात (Devri Amgaon Vidhan Sabha constituency) महायुतीत बंडखोरी करण्यात आली आहे. तरी या ठिकाणी भाजपाचे संजय पुराम आणि काँग्रेसचे राजकुमार पुराम यांच्यामध्येच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र आहे.

2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य

 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोंदिया विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा दारुण पराभव केला होता. या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1 लाख 2 हजार 996 इतकी मतं मिळाली होती. तर भाजपाचे गोपाल अग्रवाल यांना 75 हजार 827 मतं मिळाली होते. काँग्रेसचे अमर वराडे यांनी 8 हजार 938 मतं मिळवली होती.  मोरगांव अर्जुनीमध्ये  2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपच्या राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता. आमगाव देवरी या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा पराभव केला होता. विधानसभेत 2019 साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात पराभव केला होता.

ही बातमी वाचा : 

Arjuni Morgaon Vidhan Sabha constituency: अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात चौरंगी लढत, कोण मारणार बाजी?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.