निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसानी केलेल्या नाकाबंदीदरम्यान पोलिसानी जप्त केली ८० कोटींची चांदी.जप्त केलेली चांदी निवडणूक आयोग आणि प्राप्तिकर विभागाच्या पथकाकडे अधिक चौकशीसाठी सोपवण्यात आलेली आहे.
वाशी चेकनाका येथे नाकाबंदीदरम्यान चेन्नईवरून आलेला एक ट्रक तपासण्यात आला ज्यात ही चांदी होती. जवळपास ८ हजार ४७६ किलोची ही चांदी असून ती आता तपासली जात आहे.
Madha Live : माढ्यात आज शरद पवारांची तोफ धडाडणारराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि स्वतः शरद पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूरच्या माढ्यात शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे दुपारी शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेची मोठी तयार करण्यात आली आहे. शरद पवार यांची साथ सोडून महायुतीच्या गोटात सामील झालेल्या आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात शरद पवार काय बोलतात याकडेच लक्ष लागले आहे.
येथे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे अपक्ष निवडणूक लढवत आहे. अभिजीत पाटील आणि रणजितसिंह शिंदे यांच्या काटे टक्कर अशी लढत होत आहे.
Maharashtra Marathi News Live Updates : महाविकास आघाडीच्या 180 जागा निवडून येतील; आमदार रोहित पवार यांचा मोठा दावाMaharashtra News Live Updates : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेमधून साकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या किमान 180 जागा निवडून येतील असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार मोडनिंब येथे आले होते. सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला मोठं यश मिळले असा विश्वास व्यक्त केला आहे. सुरवातीला 155 -160 जगा निवडून येतील असं वाटत होतं पण लोकांचा प्रतिसाद पाहाता किमान 180 जागा निवडून येतील असा ठाम आमचा विश्वास आहे. शरद पवार,राहुल गांधी, प्रियंका गांधी, उध्दव ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे चार दिवसांपासून वातावरण तापले आहे. मोदीची मुंबईत सभा झाली. त्यांच्या सभेकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार हे स्पष्ट असल्याचं ही आमदार पवार यांनी म्हटले आहे.
Maharashtra News Live Updates: दर्यापूर राडा प्रकरणी, ४५ जणांवर गुन्हा दाखलअमरावतीच्या दर्यापूर मधील खल्लार गावात भाजप नेत्या नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा...
पोलिसांनी केले 45 जणांवर गुन्हे दाखल; चार जणांना घेतलं ताब्यात राडा करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू.