अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा शूटींगदरम्यान अपघात, पायाला दुखापत; रुग्णालयात केलं दाखल
जयदीप मेढे November 17, 2024 04:43 PM

 Nishigandha Wad :  आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री निशिगंधा वाड ( Nishigandha Wad) यांच्यासंदर्भात एक मोठी अपडेट सध्या समोर येत आहे. मालिकेच्या सेटवर शूटींगदरम्यान निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे. निशिगंधा यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, निशिगंधा वाड या कलर्स टिव्हीवरील सुमन इंदोरी या मालिकेचं शुटींग करत होत्या. याच मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा एका सीनदरम्यान अपघात झाला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आलीये. निशिगंधा वाड यांच्या अपघातानंतर मालिकेचं शूटींगही काही काळ थांबवण्यात आलं असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 

प्रोडक्शन टीमने दिली महत्त्वाची माहिती

दरम्यान निशिगंधा वाड यांच्या अपघातानंतर मालिकेच्या प्रोडक्शन टीममधील एका व्यक्तीने याबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, या अपघातामधून निशिगंधा वाड या स्थिरावल्या आहेत. त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्या एक फायटर आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होईल यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. 

निशिगंधा वाड यांच्याविषयी...

डॉ. निशिगंधा वाड यांनी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये अनेक लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.एकापेक्षा एक, वाजवा रे वाजवा, शेजारी शेजारी,सासर माहेर या सिनेमांमधून, कुलवधूसारख्या मालिकांमधून निशिगंधा यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nishigandha Waad (@nishigandhawad)

ही बातमी वाचा : 

4 वर्षांनी मायदेशी परतली, छोट्या पडद्यावर दमदार कमबॅकही केलं, आता या अभिनेत्रीनं केलं व्यवसायात पदार्पण

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.