तिसऱ्या आघाडीकडून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या प्रेमलता सोनोने यांना बुलडाणा विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गावा गावात त्यांचे दमदार स्वागत होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उमेदवारी दिल्यामुळे प्रेमलता सोनोने यांची ताकद चांगलीच वाढली आहे. दरम्यान काल, १४ नोव्हेंबरला मोताळा तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांना उदंड असा प्रतिसाद मिळाला..यावेळी मतदारांशी संवाद साधताना पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने महिलेला उमेदवारी दिली, हा खऱ्या अर्थाने जिजाऊच्या लेकीचा सन्मान असल्याचे त्या म्हणाल्या. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा गेल्या पाच वर्षात विकास झालेला नाही, मोताळा तालुक्यात गावे मूलभूत विकासापासून वंचित आहेत. त्यामूळे बुलढाना विधानसभा निवडणुकीत सप्त किरणांसह पेनाची निब या चिन्हा समोरील क्र.५ चे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन प्रेमलता सोनोने यांनी केले..