नाना पटोले हे स्वयंभू घोषित मुख्यमंत्री, त्यांच्या वक्तव्याला कोणीही बळी पडणार नाही, प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला
देवेंद्र रहांगडाले November 17, 2024 07:13 PM

Praful Patel on Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आमगावच्या सभेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अप्रत्यक्षपणे होकार दिला होता.  यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त आमदार निवडून द्यावे लागतील असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी प्रतिक्रिया जिली आहे. नाना पटोले हे स्वयंभू घोषित मुख्यमंत्री आहेत. अशा म्हणण्याने कुणी काही बनत नाही. महाराष्ट्रामध्ये तुमची सरकार आली पाहिजे असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

तुमच्या तीन पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी समन्वय नाही. राहुल गांधी हे गोंदियात येऊन गेले पण त्यांनी आतापर्यंत कोणाचंही नाव घोषित केलं नाही. कुणी काही म्हणू शकतो, उद्या मी पण म्हणू शकतो मी हे बनवणार ते बनणार. स्वयंभू घोषित काही बनणार नाही हे सर्व पब्लिक स्टंट आहेत. खूप वर्षापासून नाना पटोले यांचे स्टंट गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिक बघत आहे असा खोचक टोला त्यांनी नाना पटोले यांना लगावला. त्यांच्या वक्तव्याला कोणी बळी पडणार नाही. भंडारा-गोंदिया  जिल्ह्यातील सातही जागा आम्ही निश्चितपणाने जिंकू असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

नेमकं काय म्हणाले होते नाना पटोले?

महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये नाना पटोले यांचं नाव नेहमीच बघायला मिळते. या संदर्भात नाना पटोले यांनी आज आमगाव येथे आयोजित सभेमध्ये भाषणादरम्या मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिला आहे. आमगाव-देवरी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पुराम यांच्या प्रचारासाठी नाना पटोले आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकुमार पुराम याला आमदार बनवायचे आहे. नाही बनवलं तुम्ही तर महाराष्ट्रात नानाभाऊ उद्या काय बनणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही एक एक आमदार नाही दिले तर अडचण येणार आहे असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे. त्यामुळं नाना पटोले यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदासाठी होकार दिला आहे. गरिबारांचा आणि शेतकऱ्यांचं सरकार पाहिजे तर तुम्हाला राजकुमार पुरामला निवडून द्यावाच लागणार आहे असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान,  नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

मोठी बातमी! नानाभाऊ महाराष्ट्रामध्ये काय बनणणार हे तुम्हाला माहित, मुख्यमंत्री पदासाठी नाना पटोलेंचा अप्रत्यक्ष होकार 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.