अलोट गर्दी अन् वादळी भाषण..! डोणगावात गाजली सुजात आंबेडकरांची सभा; म्हणाले, ही भकास अवस्था बदल्यासाठी ऋतुजाताईंना विधानसभेत पाठवा; सोयाबीन कापसाच्या मुद्यावरही झाले आक्रमक....
Buldanalive November 17, 2024 04:45 PM

    मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी व शेतकरी चळवळीच्या उमेदवार डॉक्टर ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर हे डोणगाव येथे आले होते. यावेळी त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांना व्यापक जनसमर्थन लाभले असून, यंदा या मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचे मानले जात आहे. गाव, शहर ते संपूर्ण मतदारसंघ पालथा घालत ऋतुजाताईंनी जनसामान्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या प्रत्येक प्रचार सभेला, दौऱ्याला जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. ठीकठिकाणी त्यांच स्वागतही होतं आहे.

काल, दि.१६ नोव्हेंबर रोजी ऋतुजाताईंच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांची तुफान सभा अलोट गर्दीच्या साक्षीने पार पडली. जनसामान्यांनी सुजात आंबेडकर यांना प्रतिसाद दिला. सुजात आंबेडकर यांनी डोणगाव येथील वादळी सभेत 'सोयाबीन, कपाशीचे गडगडलेले भाव व डोणगाव शहराची भकास झालेली अवस्था जर बदलायची असेल, तसेच परंपरागत पक्षांना मात द्यायची असेल, तर अभ्यासू, उच्चशिक्षित, तळमळीचे उमेदवार विधानसभेत पाठवायला हवे, त्यामुळे ऋतुजाताई चव्हाण या सर्वोतपरी सक्षम पर्याय आहे. परिवर्तनासाठी, विकासासाठी ऋतुजाताईंना निवडणूक द्या, असे आवाहनही सुजात आंबेडकर यांनी केले. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने स्त्री, पुरूष व युवावर्ग उपस्थित होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.