मुंबई : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा सुरू आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झटत आहेत. हा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. मात्र या सगळ्या प्रचारात महायुतीकडून लाडकी बहीण योजना आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ या दोन मुद्द्यांवर विशेष भर दिला जात आहे. महायुतीकडून या दोन नरेटिव्हच्या आधारे मतदारांच्या मनावर ज्या गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न सुरु आहे, ते शरद पवार सातत्याने खोडून काढताना दिसत आहेत. (NCP Leader Sharada Pawar On Mahayuti.)
हेही वाचा : NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या खासदारांचा महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा; विजयी आमदारांचा आकडाच सांगितला
– Advertisement –
विधानसभेच्या अगोदर राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरेल, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. तर भाजपाची ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा हिंदू मतांचे ध्रुवीकरण घडवून आणेल, असा महायुतीचा प्रयास होता. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बटेंगे तो कटेंगे आणि लाडकी बहीणच्या आधारे महायुतीकडून सुरु असलेल्या वातावरणनिर्मितीला छेदण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीकडून या दोन नरेटिव्हच्या आधारे मतदारांच्या मनावर ज्या गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न सुरु आहे, ते शरद पवार सातत्याने खोडून काढताना दिसत आहेत.
हेही वाचा : Aaditya Thackeray : कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ याच्याशी मी सहमत; आदित्य ठाकरेंचे वक्तव्य
– Advertisement –
राज्य सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देत आहे, या गोष्टीचा आनंद आहे. मात्र या पैशांपेक्षा राज्यातील महिलांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे शरद पवार सातत्याने सांगतात. यासाठी शरद पवार हे बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणासह गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचारांची आकडेवारी मांडताना दिसत आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर 67,381 महिलांवर अत्याचार झाले. महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात 64 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत. सरकारले एका बाजुला लाडकी बहीण योजना आणली आणि दुसऱ्या बाजूला हजारो स्त्रिया बेपत्ता आहेत. हे पाप यांच्या काळात झाल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.
तसेच भाजपाकडून जातीच्या आधारावर होणारे मतविभाजन टाळण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सैफ है’ या घोषणांचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. यावरही शरद पवार हे पुण्यातील मतदानाच्या पॅटर्नचे उदाहरण देत ‘व्होट जिहाद’चे नरेटिव्ह खोडून काढताना दिसत आहेत.
Edited By komal Pawar Govalkar