Aparshakti Khurana Birthday:अपारशक्ती खुराना सध्या 'स्त्री 2' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं यश साजरं करतोय . हा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटातील अपारशक्तीचे कॉमिक टायमिंग आणि इतर कलाकारांसोबतची त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. याशिवाय अभिनेत्याचा 'बर्लिन' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. आयुषमान खुराणा आणि अपारशक्ती खुराणा या दोघांचं लहानपणापासून खास नातं राहिलं आहे. त्याच्या वडिलांनी मोठ्या भावाशी कसं वागायचे याचे नियम आखून दिले होते . घरातून बाहेर पडण्यापूर्वी रोज अपारशक्ती आयुष्यमानच्या पायाला स्पर्श करायचा . तसं न करण्याची मुभा अपारशक्तीला नव्हती असं त्यानं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीतही सांगितलं होतं. अपारशक्ती आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. दोन्ही भावांचं लहानपणी रामालक्ष्मणाचं नातं असल्याचं बोललं जातं.
वडिलांनी रोज सकाळी अपारशक्ती आपल्या मोठ्या भावाच्या पायाला हात लावायचा, अन्यथा त्याला घरात राहू दिले जाणार नाही अशी त्याच्या वडिलांची दटावणी असायची असं अपारशक्तीन सांगितलं . जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाशी कसे बोलावे हे कळत नाही, त्याचा आदर कसा करावा हे कळत नाही. अपारशक्ती आणि आयुषमान दोघे लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यातील भांडणे आणि मारामाऱ्या सोडवण्याचा एक चांगला मार्ग शोधला होता. अपारशक्ती खुराना त्याचा मोठा भाऊ आयुष्मानला खूप आदर देतो, पण दोघांचीही बालपणी एवढी दिलजमाई नव्हती. दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे. त्यानंतर दोघांमधील भांडण संपवण्यासाठी वडिलांनी अपारशक्तीला जे सांगितले, ज्याचे पालन तो आजही करतो.
बाबा मला भैय्या म्हणायला सांगायचे, पण एकदा 8-9 वर्षांचा असताना आयुषमानसोबत खेळताना झालेल्या भांडण विषयी सांगत अपारशक्तीने त्याच्या वडिलांचा किस्सा सांगितला . एकदा आठ नऊ वर्षांचा असताना झालेल्या भांडण दरम्यान आयुष्मानला काहीतरी अपशब्द बोललो होतो . त्यादिवशी मी वडिलांचा खूप मार खाल्ला होता . असं अपारशक्ती म्हणाला .बाबांची अशी धारणा होती की, " एकदा तुम्ही मोठ्या भावाला सन्मानपूर्वक वागण्या बोलण्याला सुरुवात केली की भांडण किंवा संघर्षाला कमी वाव मिळेल . मग तुम्ही त्यांच्यावर ओरडू शकत नाही आणि तुम्ही काहीही वाईट बोलू शकत नाही.
आपल्या विनोदी टायमिंगने आणि अभिनयाने रसिकांची मने जिंकून घेणारा अभिनेता म्हणून बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुरानाला ओळखले जाते. दंगल, लुका-छुपी, जबरिया जोडी, बाला, स्त्री, बद्रीनाथ की दुल्हनिया अशा अनेक विनोदी सिनेमांमधून त्याने सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. त्याच्या टायमिंगवर प्रेक्षक फिदा आहेत.